तब्बल 30 वर्षानंतर पौर्णिमेसोबतच जुळून आलाय चंद्रग्रहणाचा योग; या 4 राशींवर पडेल चांगला प्रभाव

टाइम्स मराठी । हिंदू धर्मात आणि ज्योतिष शास्त्रामध्ये चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण या दोन्ही खगोलीय घटना या महत्त्वाच्या मानल्या जातात. यंदा 28 ऑक्टोबरला शरद पौर्णिमेच्या मुहूर्तावर चंद्रग्रहण होणार आहे. तब्बल ३० वर्षानंतर हा योगायोग जुळून आला आहे. हे चंद्रग्रहण या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण असेल. यासोबतच शरद पौर्णिमेच्या दिवशी गजकेसरी योग देखील जुळून येत आहे. यामुळे हा दिवस काही राशींसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे. तब्बल 30 वर्षानंतर पौर्णिमेसोबतच आलेल्या चंद्रग्रहणाचा योग हा फार दुर्मिळ योग आहे.

   

वैदिकशास्त्र आणि जोतिषशास्त्र यानुसार राशींचे एकूण बारा प्रकार पडतात. या सोबतच कोणत्याही ग्रहाच्या राशी परिवर्तनाचा, चंद्रग्रहणाचा, दुर्मिळ योगाचा चांगला वाईट परिणाम हा राशींवर दिसत असतो. त्यानुसार काही राशींवर चांगला प्रभाव दिसून येतो तर काही राशींना या काळात वाईट अनुभव येतात. त्यानुसार आता पौर्णिमेसोबतच चंद्रग्रहणाचा योग आल्यामुळे काही राशींवर त्याचा चांगला प्रभाव दिसून येणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशीवर शुभ प्रभाव दिसेल.

१) वृषभ

बारा राशींपैकी एक म्हणजे वृषभ ही रास. या राशींच्या लोकांवर येणाऱ्या चंद्रग्रहणाचा शुभ परिणाम दिसून येणार आहे. या काळामध्ये अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. तसेच वृषभ राशींच्या व्यक्ती या काळात प्रवास करू शकतात. या काळामध्ये आर्थिक लाभ तर होईलच परंतु या व्यक्तींना मानसन्मान सुद्धा मिळण्याची शक्यता या काळात आहे. या काळामध्ये वृषभ राशींचे व्यक्ती कुटुंबासोबत आनंददायी वेळ घालवतील.

२) मिथुन

मिथुन राशींच्या व्यक्तींना या काळामध्ये महत्त्वाची आणि चांगली बातमी मिळू शकते. बऱ्याच दिवसापासून सुरू असलेला मानसिक तणाव या काळामध्ये दूर होऊ शकतो. मिथुन राशींच्या व्यक्तींना लॉटरी आणि शेअर बाजारातून चांगली कमाई होण्याचे देखील चांगले संकेत आहेत. मिथुन राशींच्या व्यक्तींचे वैवाहिक जीवन सुखदायी अनुभूती देऊ करू शकते.

३) कन्या

कन्या राशीतील व्यक्तींसाठी हा सुवर्णकाळ असू शकतो. या काळामध्ये शैक्षणिक आणि स्पर्धा क्षेत्रांशी संबंधित लोकांना यश मिळण्याची शक्यता आहे. कन्या राशींतील व्यावसायिकांना गुंतवणुकीच्या चांगल्या संधी देखील मिळू शकतात. ज्यामुळे कन्या राशीतील व्यक्तींची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते.

४) कुंभ

कुंभ राशीतील लोकांसाठी हा काळ खूप चांगला ठरणार आहे. या राशींच्या व्यक्तींच्या सुख, समृद्धी, संपत्ती मध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. कुंभ राशींच्या व्यक्तींसाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत या काळात विकसित होऊ शकतात. यामुळे पैशांची कमतरता देखील दूर होऊ शकते. कुंभ राशींच्या व्यक्तींसाठी हा काळ लाभदायी आणि भाग्यवान ठरू शकतो.