Most Expensive Electric Cars। पेट्रोल डिझेलचे वाढते भाव आणि महागाई या दोन्हीमुळे सर्वसामान्य नागरिकांचा महिन्याभराचा खर्च देखील पुरेनासा झाला आहे. अशातच इलेक्ट्रिक वाहनांनी भारतीय बाजारपेठेमध्ये स्पेशल जागा निर्माण केली आहे. इलेक्ट्रिक वाहनांची किंमत प्रत्येकाला परवडेल अशी नसून इलेक्ट्रिक कार बद्दल बोलायचं झालं तर काही इलेक्ट्रिक कारच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढल्या आहेत. अशातच बऱ्याच वाहन निर्माता कंपन्या भारतीय बाजारपेठेमध्ये स्वस्त इलेक्ट्रिक कार आणण्याचा प्रयत्न करत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत भारतातील सर्वात महागड्या इलेक्ट्रिक कार्स बद्दल.
१) मर्सिडीज बेंज EQS
मर्सिडीजची ही भारतात सर्वात जास्त रेंज देणारी इलेक्ट्रिक कार आहे. ही कार एक इलेक्ट्रिक इंजन ऑप्शन मध्ये उपलब्ध आहे. ही पाच सीटर मर्सिडीज कार असून हे इंजिन 750.97 BHP मॅक्सिमम पावर आणि 1020nm पिक टॉर्क जनरेट करते. या मर्सिडीज बेंज मध्ये 107.8 kwh लिथीयम बॅटरी देण्यात आली आहे. या बॅटरीवर कंपनीकडून ८ वर्षांची वॉरंटी देण्यात आली आहे. एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर ही इलेक्ट्रिक कार ऑल-व्हील ड्राइव्ह सिस्टीम सह 526 ते 580 किलोमीटर पर्यंत रेंज देते . या कारची एक शोरूम किंमत 1.55 ते 2.45 कोटी रुपये एवढी आहे.
२) पोर्शे टायकन कॅनवस टुरिस्मो– Most Expensive Electric Cars
पोर्शे टायकन कॅनवस टुरिस्मो ही इलेक्ट्रिक कार सात व्हेरिएंट मध्ये उपलब्ध आहे. यामध्ये दोन बॅटरी पॅक देण्यात आले आहे. त्यानुसार या इलेक्ट्रिक कार मध्ये 79.2 kwh आणि 93.4 kwh बॅटरी उपलब्ध आहे. ही बॅटरी 400 किलोमीटर पेक्षा जास्त WLTP रेंज देते. या इलेक्ट्रिक कार मध्ये सिंगल मोटर आणि ड्युअल मोटर दोन्ही व्हर्जन उपलब्ध आहेत. या इलेक्ट्रिक कारची एक शोरूम किंमत 1.50 करोड ते 2.31 कोटी रुपये एवढी आहे.
३) बीएमडब्ल्यू i7 – BMW i7
बीएमडब्ल्यू i7 या इलेक्ट्रिक कार (Most Expensive Electric Cars) सोबत एक इलेक्ट्रिक इंजन ऑप्शन देण्यात आले आहे. ही इलेक्ट्रिक कार ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह उपलब्ध आहे. या इलेक्ट्रिक कार मध्ये 101.7 KWH बॅटरी पॅक उपलब्ध आहे. यासोबतच इलेक्ट्रिक मोटर सिस्टीम देखील यामध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. ही इलेक्ट्रिक मोटर 544 पीएस पॉवर आणि 745 एन एम पी टॉप जनरेट करते. या इलेक्ट्रिक कार मध्ये पावर स्टिअरिंग, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम, ड्रायव्हर एअर बॅग, फॉग लाईट फ्रंट, मल्टी फंक्शन रियरिंग व्हील यासारखे फीचर्स देण्यात आले आहे. या इलेक्ट्रिक कारची एक शोरूम किंमत 1.95 करोड रुपये एवढी आहे.
४) ऑडी ई ट्रॉन जिटी- Audi e Tron GT
ऑडी ई ट्रॉन जिटी या इलेक्ट्रिक कारची एक्स शोरूम किंमत 1.70 ते 1.95 करोड रुपये एवढी आहे. ही इलेक्ट्रिक कार दोन व्हेरिएंट मध्ये उपलब्ध असून त्यापैकी एक म्हणजे इ-ट्रॉन जीटी आणि दुसरी म्हणजे आरएस इ-ट्रॉन जीटी . ऑडी ई ट्रॉन जिटी या इलेक्ट्रिक कार मध्ये 93.4 kwh बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी फुल चार्ज झाल्यानंतर 388 ते 500 km पर्यंत रेंज देते. ही बॅटरी चार्ज होण्यासाठी 5.15 तास लागतात. या इलेक्ट्रिक कारचे टॉप स्पीड 245 किलोमीटर प्रति तास इतकं आहे.
५) बीएमडब्ल्यू आयएक्स– BMW IX
ही एक इलेक्ट्रिक एसयूव्ही कार आहे. ही कार फक्त xDrive 40 या वेरियंटमध्ये उपलब्ध आहे. या कारमध्ये 76.6 kwh क्षमता असलेली टेंडेम बॅटरी देण्यात आली आहे. यासोबतच दोन इलेक्ट्रिक मोटर देखील उपलब्ध आहे. ही इलेक्ट्रिक कार 30 मिनिटांमध्ये शून्य ते 80 टक्के चार्ज होते. ही कार 425 किलोमीटर पर्यंत रेंज देते. या इलेक्ट्रिक एसयूव्हीची एक शोरूम किंमत 1.16 करोड रुपये एवढी आहे.