Moto G Power 5G येणार अपडेटेड व्हर्जनमध्ये; काय फीचर्स मिळणार

टाइम्स मराठी । स्मार्टफोन निर्माता कंपनी Motorola भारतात नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. सध्या मार्केटमध्ये मोटोरोला कंपनीचा  MOTO G POWER 5G हा मोबाईल उपलब्ध आहे. आता या स्मार्टफोनचे नवीन व्हर्जन कंपनी लॉन्च करत आहे. या स्मार्टफोनच्या लॉन्चिंग बद्दल अजून घोषणा करण्यात आली नसून 2024 मध्ये हा स्मार्टफोन लॉन्च होऊ शकतो. नुकत्याच या स्मार्टफोनचे फोटोज वेबसाईटवर लीक झाले. त्यानुसार जाणून घेऊया या स्मार्टफोन मध्ये कोणकोणते फीचर्स मिळतील.

   

कॅमेरा

MOTO G POWER 5G च्या नवीन व्हर्जनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप मिळू शकतो. या स्मार्टफोनच्या जुन्या मॉडेलमध्ये ट्रिपल रियल कॅमेरा उपलब्ध होता. लीक झालेल्या फोटो नुसार या स्मार्टफोनच्या फ्रंट कॅमेरा स्क्रीनवर सेंटर ए लाईन पंच होल स्लॉट उपलब्ध आहे. हेअर सलोट वोल्युम आणि पावर बटनाच्या डाव्या कोपऱ्यात  दिसेल. या स्मार्टफोनच्या किमती बद्दल अजून खुलासा करण्यात आलेला नाही.

स्पेसिफिकेशन

MOTO G POWER 5G या नवीन वर्जन स्मार्टफोनमध्ये  6.7 इंच फ्लॅट स्क्रीन मिळू शकते. या स्क्रीनची साईज 167.3 mm ×76.4 mm × 8.5 mm एवढी असेल. सध्या उपलब्ध असलेल्या मॉडेल पेक्षा हा स्मार्टफोन साईज ने मोठा असेल. यामध्ये मोटोरोला कंपनीकडून ऑक्टाकोर मीडियाटेक डायमेन्शन 930 SOC प्रोसेसर देण्यात येऊ शकते. यासोबतच स्मार्टफोनमध्ये 5000 mAh बॅटरी मिळू शकते. ही बॅटरी 10W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.