Moto G Stylus 5G : 50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरीसह Moto ने लाँच केला जबरदस्त मोबाईल

टाइम्स मराठी । प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी मोटोरोलाच्या मोबाईलला ग्राहकांची चांगली पसंती मिळते. कंपनी सुद्धा ग्राहकांच्या गरजेनुसार अपडेटेड फीचर्ससह नवनवीन मोबाईल बाजारात आणत असते. आताही आश्चह एक नवा स्मार्टफोन मार्केटमध्ये लाँच केला आहे. Moto G Stylus 5G असे या मोबाईलचे नाव असून यामध्ये 50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरीसह अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. आज आपण मोटोच्या या हँडसेटबाबत संपूर्ण माहिती जाणून घेऊयात …

   

6.7 इंचाचा डिस्प्ले –

Moto G Stylus 5G मध्ये कंपनीने 120Hz रिफ्रेश रेटसह 6.7 इंचाचा POLED डिस्प्ले दिला आहे. या डिस्प्लेला 1200 nits चा पीक ब्राइटनेस आणि 240Hz चा टच सॅम्पलिंग रेट मिळतोय. मोबाईलमध्ये Snapdragon 6 Gen 1 5G SoC प्रोसेसर बसवण्यात आला असून तो Android 14 वर काम करतो. स्मार्टफोनमध्ये ८ जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने हेच स्टोरेज तुम्ही 2TB पर्यंत वाढवू शकता.

कॅमेरा – Moto G Stylus 5G

मोबाईलच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास, Moto G Stylus 5G च्या पाठीमागील बाजूला 50MP चा मुख्य कॅमेरा, आणि 13 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा देण्यात आला आहे तर समोरील बाजूला विडिओ कॉल आणि सेल्फी साठी 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी मोबाईल मध्ये 5000mAh ची बॅटरी बसवण्यात आली असून हि बॅटरी 30W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटीसाठी, मोबाईल मध्ये टाइप-सी, 3.5 मिमी ऑडिओ जॅक, ड्युअल बँड वायफाय, ब्लूटूथ 5.1 देखील आहे

किंमत किती?

Moto G Stylus 5G (2024) स्मार्टफोनची किंमत $399.99 (अंदाजे रुपये 33,000) आहे. हा मोबाईल Caramel Latte आणि Scarlet Wave कलरमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. सध्या मोटोचा हा हँडसेट अमेरिकेत लाँच करण्यात आला असून त्याची विक्री 30 मे पासून सुरू होणार आहे.