Moto G04s मोबाईल लाँच!! 50MP कॅमेरासह मिळतात दमदार फीचर्स

टाइम्स मराठी । प्रसिद्ध मोबाईल ब्रँड Motorola ने जागतिक बाजारात आपला नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. Moto G04s असे या मोबाईलचे नाव असून या स्मार्टफोनचे डिझाईन यापूर्वी लाँच केलेल्या Moto G04v सारखीच आहे. सध्या कंपनीने जर्मनी मध्ये हा मोबाईल लाँच केला असून लवकरच तो भारत सुद्धा उपलब्ध करण्यात येईल. आज आपण या स्मार्टफोनचे खास फीचर्स जाणून घेऊयात…

   

6.56 इंचाचा डिस्प्ले- Moto G04s

Moto च्या या स्मार्टफोनची लांबी 163.49 मिमी, रुंदी 74.53 मिमी आणि जाडी 7.99 मिमी तर मोबाईलचे वजन 178 ग्रॅम आहे. Moto G04s मध्ये HD+ रिझोल्यूशनसह 6.56-इंचाचा IPS LCD डिस्प्ले देण्यात आला असून हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेट आणि 720 x 1612 पिक्सेल रिसोल्युशन सह येतो. स्क्रिनला गोरिल्ला ग्लास 3 चे प्रोटेक्शन देण्यात आलं आहे. Moto G04s मध्ये Unisoc T606 प्रोसेसर मिळतो. तसेच 4GB रॅम आणि 64GB UFS 2.2 स्टोरेज ची सुविधा उपलब्ध आहे. हि रॅम व्हर्च्युअल रॅमद्वारे 8GB पर्यंत वाढवता येते.

50-मेगापिक्सलचा कॅमेरा

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, पाठीमागील बाजूला LED फ्लॅश युनिटसह 50-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा देण्यात आलाय तर समोरील बाजूला सेल्फी आणि विडिओ कॉलसाठी 5 मेगापिक्सेल कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी 5,000mAh बॅटरी देण्यात आली असून हि बॅटरी 15W चार्जिंगला सपोर्ट करते. अन्य फिचर बाबत सांगायचं झाल्यास, मोबाईल मध्ये ड्युअल सिम, 4G VoLTE, Wi-Fi 802.11ac, ब्लूटूथ 5.0, NFC, GPS, एक 3.5 मिमी ऑडिओ जॅक आणि डॉल्बी ॲटमॉस सपोर्ट असलेले सिंगल स्पीक यांसारखे फीचर्स मिळतात.