टाइम्स मराठी । इलेक्ट्रॉनिक कंपनी मोटोरोला आपल्या ग्राहकांसाठी एक खास आणि वेगवेगळ्या फीचर्सने परिपूर्ण असलेला मोबाईल १ ऑगस्टला लॉन्च करणार आहे. या मोबाईलचे नाव Moto G14 असं असून फ्लिपकार्ट च्या माध्यमातून तुम्ही या स्मार्टफोनची प्री बुकिंग करू शकता. या मोबाईलचे वैशिष्ट्ये म्हणजे एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर हा स्मार्टफोन दिवसभर चालू शकतो. आज आपण Moto G14 चे मुख्य फीचर्स, कॅमेरा, आणि डिस्प्ले याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
6.5 इंच डिस्प्ले –
Moto G14 या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंच फुल HD रिझोल्युशन सह डिस्प्ले देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर या डिवाइसमध्ये ऑक्टा कोर Unisoc T6 16 Soc चिपसेट देखील उपलब्ध आहे. Moto G14 128 GB UFS 2.2 इंटरनल स्टोरेज सह लॉन्च करण्यात येणार आहे. या स्मार्टफोनमध्ये मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने 1 TB स्टोरेज वाढवता येऊ शकते. हा स्मार्टफोन Android 13 बेस्ड असून यासोबत तीन वर्षाचे सेक्युरिटी अपडेट देखील देण्यात येणार आहे.
कॅमेरा –
मोबाईलच्या कॅमेराबाबत बोलायचं झाल्यास, Moto G14 मध्ये कंपनीने 50 MP चा ड्युअल कॅमेरा सेटअप दिला आहे. तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉल साठी समोरील बाजूला ८ MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. मोबाईल मध्ये एलईडी फ्लॅश देखील यात देण्यात आला आहे. यामध्ये नाईट व्हिजन आणि मायक्रोविजन सारखे फोटो काढू शकता. त्याचबरोबर या स्मार्टफोनमध्ये मध्यभागी पंचहोल कट आउट देण्यात आला आहे.
5000mAh बॅटरी –
या स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी पॅक देण्यात आलेला असून ही बॅटरी 20W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीचा दावा आहे की हा फोन 34 तास चालू शकतो. तसेच व्हिडिओ वगैरे बघितले तरीही 16 तास चालेल. मोबाईलच्या अन्य फीचर्स बाबत सांगायचं झाल्यास, moto G14 या स्मार्टफोनमध्ये साईड फेसिंग फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आलेले असून यात पाणी आणि धूळ रोखण्यासाठी IP52 देखील उपलब्ध आहे. त्याचबरोबर यामध्ये डॉल्बी ऍटमॉस टेक्नॉलॉजी सपोर्टेड डियर स्टेरियो स्पीकर देण्यात आलेले आहे. या स्मार्टफोनची किंमत अजून सांगण्यात आलेली नसून लवकरच हा स्मार्टफोन लॉन्च करण्यात येणार आहे.