Moto G14 स्मार्टफोन 24 ऑगस्टला होणार लॉन्च; पहा किंमत आणि फीचर्स

टाइम्स मराठी | प्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक कंपनी मोटोरोलाने उद्या 24 ऑगस्ट रोजी ग्राहकांसाठी एक खास आणि वेगवेगळ्या फीचर्सने परिपूर्ण असलेला मोबाईल लॉन्च करणार आहे. कंपनीकडून या स्मार्टफोनमध्ये 2 नवीन रिफ्रेश कलर ऑप्शन देण्यात आले आहे. यामध्ये बटर क्रीम आणि पेल लिलैक कलर ऑप्शन उपलब्ध आहेत. तुम्ही हा स्मार्टफोन खरेदी करू इच्छित असाल तर 24 ऑगस्टला फ्लिपकार्ट च्या माध्यमातून तुम्हाला खरेदी करता येईल. भारतात हा स्मार्टफोन 9999 रुपयांमध्ये तुम्ही खरेदी करू शकता. आज आपण moto च्या या मोबाईल ची खास फीचर्स जाणून घेऊया.

   

Moto G14 स्पेसिफिकेशन

Moto G14 या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंच फुल HD रिझोल्युशन सह डिस्प्ले देण्यात आलेला आहे. या डिस्प्ले ची पिक्सेल डेन्सिटी 405 PPI एवढी आहे. त्याचबरोबर यामध्ये ऑक्टा कोर Unisoc T6 16 Soc चिपसेट देखील उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन 128 GB UFS 2.2 इंटरनल स्टोरेजसह लॉन्च करण्यात आले आहे. moto G14 हा स्मार्टफोन Android 13 बेस्ड असून यासोबत Android 14 अपडेट आणि तीन वर्षाची सेक्युरिटी अपडेट देखील उपलब्ध आहे. या स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी पॅक देण्यात आलेला असून ही बॅटरी 20W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Moto G14 कॅमेरा

Moto G14 या स्मार्टफोनच्या कॅमेरा बद्दल बोलायचं झालं तर, यामध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. यातील प्रायमरी कॅमेरा 50 MP चा आहे. तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉल साठी समोरील बाजूला 2MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. एलईडी फ्लॅश देखील यात देण्यात आला आहे. यासोबतच स्मार्टफोन मध्ये क्वॉड पिक्सल टेक्नॉलॉजी देखील उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन पेज डिटेक्शन ऑटो फोकस आणि F/1.8 अपर्चरसह तुम्ही यात नाईट व्हिजन आणि मायक्रोविजन सारखे फोटो काढू शकतात.

Moto G14 कनेक्टिव्हिटी

Moto G14 या स्मार्टफोनमध्ये साईड फेसिंग फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आलेले असून यात पाणी आणि धूळ रोखण्यासाठी IP52 देखील उपलब्ध आहे. या स्मार्टफोनच्या कनेक्टिव्हिटी बद्दल बोलायचं झालं तर यामध्ये 4G LTE, ड्युअल बँड वाय-फाय, जीपीएस, एजीपीएस, 3.5 mm हेडफोन जॅक, आणि यूएसबी टाइप सी पोर्ट देखील उपलब्ध आहे.