Moto G24 Power : 8GB रॅमसह Moto ने लाँच केला नवा मोबाईल; किंमत 10 हजारापेक्षा कमी

टाइम्स मराठी । प्रसिद्ध मोबाईल ब्रँड Motorola ने भारतीय बाजारात ग्राहकांना परडवेल अशा किमतीत नवा मोबाईल लाँच केला आहे. Moto G24 Power असे या स्मार्टफोनचे नाव असून तुम्हाला कमी पैशात सर्व अपडेटेड फीचर्स या मोबाईल मध्ये मिळतील. महत्वाची गोष्ट म्हणजे Moto च्या या मोबाईल मध्ये 8GB ची दमदार रॅम मिळतेय आणि त्याची किंमत सुद्धा १० हजारापेक्षा कमी आहे. आज आपण या मोबाईलचे संपूर्ण स्पेसिफिकेशन जाणून घेऊयात.

   

6.56-इंचाचा डिस्प्ले – Moto G24 Power

Moto G24 Power मध्ये 6.56-इंचाचा IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेला 90Hz रिफ्रेश रेट आणि 500 ​​nits पर्यंत पीक ब्राइटनेस मिळतो. कंपनीने या स्मार्टफोन मध्ये MediaTek Helio G85 SoC प्रोसेसर दिला असून हा स्मार्टफोन Android 14 वर आधारित My UX कस्टम स्किनवर काम करतो. हा मोबाईल 4GB रॅम +128 GB स्टोरेज आणि 8GB रॅम + 128 GB स्टोरेज व्हेरिएन्ट मध्ये लाँच करण्यात आला आहे. पॉवर साठी यामध्ये 6,000mAh ची बॅटरी देण्यात आली असून ही बॅटरी 30W टर्बो फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

50 मेगापिक्सलचा कॅमेरा –

मोबाईलच्या कॅमेराबद्दल सांगायचं झाल्यास, या स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे तर समोरील बाजूला सेल्फी आणि विडिओ कॉल साठी 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. अन्य फीचर्सबाबत सांगायचं झाल्यास, साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर, 3.5mm हेडफोन जॅक आणि ब्लूटूथ 5.0 यांसारखे फीचर्स देण्यात आले आहेत. हा स्मार्टफोन IP52 रेटिंगसह येतो म्हणजेच पाणी आणि धूळ पासून मोबाईलला संरक्षण मिळते

किंमत किती ?

मोबाईलच्या किमतीबाबत सांगायचं झाल्यास, Moto G24 Power च्या 4GB + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 8,999 रुपये आहे आणि 8GB + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 9,999 रुपये आहे. हा मोबाईल ग्लेशियर ब्लू आणि इंक ब्लू या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. येत्या 7 फेब्रुवारी 2024 पासून Flipkart, ब्रँडची अधिकृत वेबसाइट आणि रिटेल स्टोअरवर खरेदीसाठी उपलब्ध असेल.