हॅलो महाराष्ट ऑनलाईन । तुम्ही जर कमी पैशात आणि स्वस्तात मस्त मोबाईल खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हि बातमी खास तुमच्यासाठीच आहे. प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Motorola ने Moto G45 5G नावाचा स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 10,999 रुपये आहे. कमी किमतीमध्येही ग्राहकांना अनेक खास फीचर्स या हँडसेट मध्ये पाहायला मिळतात. 50MP कॅमेरा, 5,000mAh बॅटरीसह हा मोबाईल सुसज्ज आहे. आज आपण मोटोच्या या स्मार्टफोनची संपूर्ण माहिती जाणून घेऊयात….
Moto G45 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.5-इंच HD+ LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 720 x 1,600 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. तसेच संरक्षणासाठी गोरिला ग्लास 3 चे प्रोटेक्शन देण्यात आलं. कंपनीने या स्मार्टफोन मध्ये Qualcomm Snapdragon 6s Gen 3 SoC चिपसेट बसवली असून मोटोचा हा स्मार्टफोन Android 14 OS या ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतो. Motorola या युनिटवर Android 15 आणि तीन वर्षांच्या सुरक्षा अपडेट्सची गॅरेंटी देत आहे. .
कॅमेरा – Moto G45 5G
मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, G45 5G मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसह देण्यात आला आहे. यामध्ये 50-मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा, आणि 2-मेगापिक्सेल मॅक्रो सेन्सर आहे तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉल साठी समोरील 16-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. फोन IP52-रेटेड वॉटर-रेपेलेंट सह येतो, म्हणजेच धूळ आणि पाणी पासून संरक्षण मिळते. पॉवरसाठी स्मार्टफोनमध्ये 5,000mAh बॅटरीसह बसवण्यात आली असून हि बॅटरी USB Type-C 20W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. अन्य फीचर्सबाबत सांगायचं झाल्यास या स्मार्टफोन मध्ये ब्लूटूथ 5.1, Wi-Fi 802.11 a/b/g/n/ac, GPS, A-GPS, 3.5mm हेडफोन जॅक यांसारखे फीचर्स मिळतात.
किंमत किती?
4GB+128GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत 10,999 रुपये आहे तर 8GB+128GB वेरिएंटची किंमत 12,999 रुपये आहे. तुम्ही फ्लिपकार्ट, मोटोरोला वेबसाइटवरून हा स्मार्टफोन खरेदी करू शकता. काही निवडक बँकांचे कार्ड वापरून मोबाईल खरेदी केल्यास ग्राहकांना 1000 रुपयांचा डिस्काउंट मिळतोय. हा मोबाईल हिरवा, निळा आणि गुलाबी रंगात उपलब्ध आहे.