टाइम्स मराठी । प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी मोटोरोलाने आपला Moto G84 5G हा स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. या मोबाईलची खास गोष्ट म्हणजे यामध्ये तुम्हाला तब्बल 12GB ची रॅम आणि 256 GB इंटर्नल स्टोरेज मिळत आहे. त्यामुळे खास करून गेमिंग साठी सुद्धा हा मोबाईल चांगलाच फायदेशीर ठरू शकतो. तसेच जास्त रॅम असलयाने हँग होण्याचा सुद्धा कोणताही धोका नाही. आज आपण मोटोच्या या मोबाईलचे खास फीचर्स आणि त्याची किंमत याबाबत सविस्तरपणे जाणून घेऊयात .
6.55 इंचा चा डिस्प्ले –
Moto G84 5G या स्मार्टफोनमध्ये 6.55 इंचचा FHD+ POLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120 hz रिफ्रेश रेट सह उपलब्ध आहे. मोटोरोला कंपनीचा हा स्मार्टफोन अँड्रॉइड 13 वर चालतो. यामध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर देण्यात आले आहे. यासोबतच स्मार्टफोन मध्ये एक वर्षासाठी कंपनीने OS अपडेट देखील दिले आहे. म्हणजेच अँड्रॉइड 14 लादेखील हा स्मार्टफोन सपोर्ट करू शकतो.
कॅमेरा – Moto G84 5G
Moto G84 5G या स्मार्टफोनमध्ये देण्यात आलेल्या कॅमेरा बद्दल बोलायचं झालं तर, यामध्ये OIS 50 MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 8MP अल्ट्रावाइड कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय सेल्फी आणि व्हिडिओ कॉल साठी समोरील बाजूला 16MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. मोटोच्या या मोबाईल मध्ये 5000 mAh बॅटरी देण्यात आली असून ही बॅटरी 33 W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
किंमत किती?
Moto G84 5G हा मोबाईल तुम्हाला 12 GB Ram आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेज मध्ये उपलब्ध आहे. भारतीय बाजारात या मोबाईलची किंमत 19,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन मैजंटा, मार्शमैलो ब्ल्यू, मिडनाईट ब्ल्यू हे तीन कलर ऑप्शन्स मध्ये मिळतोय. तुम्ही हा स्मार्टफोन खरेदी करू इच्छित असाल तर 8 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता फ्लिपकार्ट च्या माध्यमातून खरेदी करू शकता. कंपनीने या मोबाईल वर डिस्काउंट ऑफर देखील दिली आहे. जर तुम्ही आयसीआयसीआय बँकेच्या कार्डच्या माध्यमातून हा स्मार्टफोन खरेदी करत असाल तर तुम्हाला एक हजार रुपयांचा डिस्काउंट मिळू शकतो. म्हणजेच तुम्ही 18 हजार 999 मध्ये हा स्मार्टफोन घरी घेऊन येऊ शकतात.