धमाका ऑफर!! फक्त 549 रुपयांत खरेदी करा Moto चा दमदार Mobile

टाइम्स मराठी । तुम्ही जर स्वस्तात मस्त आणि दमदार फीचर्सने सुसज्ज अशा मोबाईलच्या शोधात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी मोटोरोलाचा Motorola e13 हा मोबाईल तुम्ही फक्त 549 रुपयांत खरेदी करू शकता. 8GB रॅम आणि128 GB इंटरनल स्टोरेज असलेला हा स्मार्टफोन फक्त 549 रुपयांत कुठे मिळतोय हेच आपण जाणून घेऊयात. त्यापूर्वी या मोबाईलची खास फीचर्स आपण पाहुयात.

   

6.5 इंचचा डिस्प्ले –

Motorola e13 या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंच चा HD +LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. हा मोबाईल UNISOC T606 डॉक्टा कोर प्रोसेसर वर काम करतो. त्याचबरोबर या स्मार्टफोन मध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आलेली असून ही बॅटरी 10W च्या फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. युनि सो प्रोसेसर सोबतच ग्राफिक्स साठी यात MaliG57 MC2 650MHz GPU देण्यात आले आहे.

Motorola e13 कॅमेरा

Motorola e13 या स्मार्टफोनमध्ये दिलेल्या कॅमेरा बद्दल बोलायचं झालं तर यात AI वर चालणारा कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर प्रायमरी कॅमेरा 13 MP असून फ्रंट कॅमेरा 5 मेगापिक्सल उपलब्ध आहे. त्याचबरोबर या स्मार्टफोनमध्ये 8GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज देण्यात आलेले असून मायक्रो एसडी कार्ड च्या माध्यमातून 1TB पर्यंत तुम्ही स्टोरेज वाढवू शकतात.

Motorola e13 कनेक्टिव्हीटी

Motorola e13 स्मार्टफोनच्या कनेक्टिव्हिटी बद्दल बोलायचं झालं तर, यामध्ये ड्युअल 4G VoLTE, wifi 802.11 ac, ब्लूटूथ 5.0, GPS, यूएसबी टाइप सी देण्यात आले आहे. यासोबतच कंपनीने या स्मार्टफोनच्या खरेदीवर वेगवेगळ्या ऑफर्स आणल्या आहेत.

फक्त 549 रुपयांत खरेदी करा Motorola e13

Motorola e13 हा स्मार्टफोन तुम्ही ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट वरून खरेदी करू शकता. या स्मार्टफोनची किंमत 8GB रॅम आणि 128 स्टोरेज साठी 8,999 रुपये एवढी आहे. फ्लिपकार्टवर या स्मार्टफोनच्या खरेदीवर पाचशे रुपये डिस्काउंट देण्यात आला आहे. जर तुम्ही हा स्मार्टफोन खरेदी करताना कोणताही बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वरून पेमेंट करत असाल तरी या फोनवर तुम्हाला पाचशे रुपयांचा डिस्काउंट देण्यात येईल. यासोबतच एक्सचेंज ऑफर देखील देण्यात आली आहे. जर तुमच्याकडे कोणताही जुना स्मार्टफोन असेल तर तुम्ही हा स्मार्टफोन एक्सचेंज करून फक्त 549 रुपयांत घरी घेऊन येऊ शकता. या स्मार्टफोनवर 8,450 रुपयाचा एक्सचेंज ऑफर देण्यात आला आहे. म्हणजेच तुम्ही एक्सचेंज ऑफर मध्ये 549 रुपयांमध्ये हा स्मार्टफोन खरेदी करू शकता.