32 MP फ्रंट कॅमेरासह Motorola चा मोबाईल बाजारात घालणार धुमाकूळ

टाइम्स मराठी । प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Motorola ने Edge सिरीज मध्ये नवीन स्मार्टफोन ऍड केला आहे. या स्मार्टफोनची किंमत 599 डॉलर म्हणजेच भारतीय चलनानुसार 49,000 रुपये एवढी आहे. कंपनीने हा मोबाईल एक्लिप्स ब्लॅक कलर मध्ये उपलब्ध केला आहे. आज आपण या मोबाईलचे खास फीचर्स जाणून घेणार आहोत.

   

डिझाईन

Motorola Edge 2023 हा स्मार्टफोन कंपनीने युनिक डिझाईन मध्ये उपलब्ध केला आहे. या मोबाईल मध्ये वेगन लेदर टेक्चर बॅक पॅनल देण्यात आले आहे. कंपनीने या स्मार्टफोनमध्ये ॲल्युमिनियम मिड फ्रेम वापरली असून यामध्ये कर्व्ह शेप मध्ये कॅमेरा मॉडेल उपलब्ध आहे.

स्पेसिफिकेशन

Motorola Edge 2023 मध्ये 10 बीट 6.6 इंच कर्व pOLED FHD डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 2400 x 1080 पिक्सेल रिझोल्युशन प्रदान करतो. आणि  144Hz रिफ्रेश रेटयामध्ये तुम्हाला मिळतो. हा डिस्प्ले 1200 निट्स पीक ब्राइटनेस देतो. हा स्मार्टफोन एंड्रॉयड 13 वर बेस्ड MyUX वर काम करतो. कंपनीने या मोबाईल मध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 7030 प्रोसेसर दिला आहे. हा प्रोसेसर गेमिंगला देखील सपोर्ट करते.

कॅमेरा

Motorola Edge 2023 या स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्यानुसार यामध्ये 50 मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा, 13 मेगापिक्सेल अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा, 32 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. कंपनीने प्रायमरी कॅमेरा सह OIS सपोर्ट दिला आहे. या स्मार्टफोनमध्ये 4400 MAH बॅटरी देण्यात आली असून ही बॅटरी 68 W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. एवढेच नाही तर 15 W वायरलेस आणि 5 W रिव्हर्स वायरलेस चार्जिंग सपोर्ट देखील यामध्ये उपलब्ध आहे.

कनेक्टिव्हिटी फीचर्स

Motorola Edge 2023 या स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट सेंसर, ड्युअल सिम 5g,  ब्लूटूथ,  वाय-फाय यासारखे बरेच फीचर्स देण्यात आले आहे. एवढेच नाही तर हा मोबाईल IP68 रेटिंग ने सुसज्ज आहे. म्हणजेच हा स्मार्टफोन धूळ,पाणी यापासून सिक्युअर आहे.