टाइम्स मराठी । भारतामध्ये आज Motorola कंपनीने नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनचं नाव Motorola Edge 40 Neo 5G आहे. या मोबाईलची किंमत 23 हजार 999 रुपयांपासून सुरू होते. मार्केटमध्ये हा स्मार्टफोन Oneplus Nord CE 3 lite या मोबाईलला तगडी टक्कर देईल. तुम्ही सुद्धा या दोन्ही मधील नेमका कोणता मोबाईल खरेदी करायचा या विचारात गोंधळलेले असाल तर चिंता करू नका. आज आम्ही या दोन्ही मोबाईलचे खास फीचर्स, कॅमेरा, क्वालिटी, किंमत याबाबत संपूर्ण तुलना करून सांगणार आहोत. त्यानंतर तुम्हीच ठरवा नेमका कोणता मोबाईल तुमच्यासाठी बेस्ट आहे.
स्पेसिफिकेशन
Motorola Edge 40 Neo 5G हा स्मार्टफोन मीडियाटेक डायमेंसिटी 7030 प्रोसेसर वर काम करतो. मोबाईलमध्ये 6.55 इंचाचा OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 144 hz रिफ्रेश रेट आणि 2400×1080 पिक्सेल रिझोल्युशन सह येतो. कंपनीने या स्मार्टफोनची स्क्रीन पंच होल स्टाईलने सुसज्ज आहे. तर दुसरीकडे Oneplus Nord CE 3 lite या स्मार्टफोनमध्ये 6.72 इंच फुल एचडी प्लस पंच हॉल डिस्प्ले देण्यात आला आहे. हा एलसीडी डिस्प्ले असून 2400 ×1080 पिक्सेल रिझोल्युशन आणि 120 HZ रिफ्रेश रेट सह येतोय. मोबाईल मध्ये 680 नीट्स ब्राईटनेस, 391 पीपीआय पिक्सेल डेन्सिटी, 16.8 बिलियन कलर सपोर्ट, आय कम्फर्ट आणि स्क्रीन कलर टेंपरेचर देण्यात आले आहे. मोबाईल मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 ऑक्टो कोर प्रोसेसर देण्यात आला आहे.
कॅमेरा
दोन्ही मोबाईलच्या कॅमेरा बाबत सांगायचं झाल्यास, Motorola edge 40 Neo या स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफी आणि सेल्फी साठी ड्युअल रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध करण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह F/1.8 अपर्चरसह प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सल, अल्ट्रा वाइड 13 मेगापिक्सल आणि सेल्फी साठी समोरील बाजूला 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तर दुसरीकडे, Oneplus Nord CE lite या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर्स कॅमेरा सेटअप मिळतो. यामध्ये बॅक पॅनलवर 108 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, २ मेगापिक्सल डेप्थ सेंसर, आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो सेंसर देण्यात आला आहे. याशिवाय सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा यामध्ये उपलब्ध आहे.
बॅटरी
Motorola edge 40 Neo 5G या नुकत्याच लॉन्च झालेल्या स्मार्टफोनमध्ये पावर बॅकअप साठी 5000 mAh बॅटरी देण्यात आली आहे. हि बॅटरी 66 W टर्बो चार्जला सपोर्ट करते. या चार्जिंगच्या माध्यमातून अवघ्या पंधरा मिनिटांमध्ये हा मोबाईल 50% चार्ज होईल. तर दुसरीकडे Oneplus nord CE 3 light 5G या स्मार्टफोनमध्ये 5000 mAh बॅटरीदेण्यात आली असून ही बॅटरी 67 W सुपरवुक फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या चार्जरच्या माध्यमातून फक्त तीस मिनिटांमध्ये स्मार्टफोन 80% चार्ज होतो. एवढेच नाही तर मोबाईल मध्ये देण्यात आलेली बॅटरी हेल्थ इंजिन आणि बिल्ट इन टेम्परेचर सेंसर च्या माध्यमातून ओवर चार्ज आणि हिट होण्यापासून वाचवते.
फीचर्स
Motorola edge 40 Neo 5G या स्मार्टफोनमध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आले आहे. त्याचबरोबर या स्मार्टफोनला IP68 रेटिंग देखील उपलब्ध करण्यात आली आहे. यामुळे वॉटर आणि डस्ट प्रूफ राहण्यास स्मार्टफोन सक्षम आहे. या मोबाईल सोबत डॉल्बी ऍटमॉस ड्युअल स्टॅरो स्पीकर्स देण्यात आले आहे. यासोबतच वाय-फाय 802.11 a/b/g/n/ac/ax, 2.4 GHz 5Ghz, 6Ghz उपलब्ध आहे.
Oneplus nord CE 3 LITE या स्मार्टफोनमध्ये साईड माउंट एड फिजिकल फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आले आहे. त्याचबरोबर या स्मार्टफोनमध्ये वॉटरप्रूफिंग देखील उपलब्ध आहे. या स्मार्टफोनसोबत ड्युअल स्टीयरो ऑफ स्पीकर आणि नॉईस कॅन्सलेशन सपोर्ट देखील उपलब्ध आहे. त्याचबरोबर स्मार्ट फोनमध्ये वाय-फाय 802.11 a/b/g/n/ac, 2.4 GHz 5Ghz सपोर्ट उपलब्ध आहे.
किंमत किती –
Motorola edge 40 Neo 5G या स्मार्टफोनची किंमत स्टोरेज व्हेरिएंट प्रमाणे वेगवेगळी आली आहे. त्यानुसार 8 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज असलेल्या स्मार्टफोनची किंमत 23,999 रुपये ठेवण्यात आली आहे. आणि 12 GB रॅम प्लस 256 GB स्टोरेज व्हेरिएंट असलेल्या स्मार्टफोनची किंमत 25,999 एवढी आहे. तर दुसरीकडे Oneplus Nord CE 3 Lite 5G या स्मार्टफोनची किंमत देखील स्टोरेज व्हेरिएंट प्रमाणे उपलब्ध आहे. त्यानुसार 8 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज असलेल्या स्मार्टफोनची किंमत 19,999 रुपये एवढी आहे. आणि 12 GB रॅम + 256 GB स्टोरेज व्हेरिएंट असलेल्या स्मार्टफोनची किंमत 21,999 एवढी आहे.