टाइम्स मराठी । प्रसिद्ध मोबाईल कंपनी मोटोरोला ने Motorola Edge 40 आणि Moto G32 हे २ मोबाईल नवीन कलर पर्यायांसह भारतीय बाजारपेठेत लाँच केले आहेत. नव्या फीचर्ससह लाँच झालेले हे दोन्ही मोबाईल तरुणाईला नक्कीच आवडतील यात शंकाच नाही. आज आपण मोटोच्या या दोन्ही मोबाईलचे फीचर्स, कॅमेरा क्वालिटी, रॅम आणि किंमत याबाबत सविस्तर जाणून घेऊया.
डिस्प्ले –
मोबाईलच्या डिस्प्लेबाबत सांगायचं झाल्यास, Moto G32 मध्ये 60Hz रिफ्रेश रेटसह 6.5-इंचाचा FHD+ LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. या मोबाईलमध्ये Qualcomm Snapdragon 680 Adreno 610 GPU चिपसेट बसवण्यात आली आहे. तर दुसरीकडे Motorola Edge 40 मध्ये 144Hz रिफ्रेश रेटसह 6.55-इंचाचा FHD+ poLED डिस्प्ले देण्यात आला असून या मोबाईल मध्ये MediaTek Dimensity 8020 चिपसेट बसवण्यात आली आहे.
कॅमेरा –
दोन्ही मोबाईलच्या कॅमेराबाबत माहिती द्यायची झाल्यास Moto G32 मध्ये 50MP चा मुख्य कॅमेरा, 8MP चा अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि 2MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूला 16MP चा फ्रंट कॅमेरा मिळतोय. दुसरीकडे Motorola Edge 40 मध्ये 50MP चा मुख्य कॅमेरा, 13MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूला 32 MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आलाय. Moto G32 मध्ये
30W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी मिळतेय तर Motorola Edge 40 मध्ये 68W फास्ट चार्जिंगसह 4,400mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.
किंमत किती?
Motorola G32 च्या 8GB+128GB स्टोरेज व्हेरिएंट असलेल्या मोबाईलची किंमत 11,999 रुपये आहे. तुम्हाला हा स्मार्टफोन मिनरल ग्रे आणि सॅटिन सिल्व्हर, सॅटिन मरून आणि रोज गोल्ड या कलरमध्ये खरेदी करता येईल. नवीन कलर ऑप्शन मध्ये लाँच झालेला हा मोबाईल 26 जूनपासून बाजारात उपलब्ध होईल. दुसरीकडे Motorola Edge 40 च्या 8GB+256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 29,499 रुपये ठेवण्यात आली आहे. 28 जूनपासून हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर उपलब्ध होईल.
मोटोरोला या कंपनीने या नवीन स्मार्टफोनसह विवा मॅग्नेटा या कलर मध्ये Moto edge 40 हा स्मार्टफोन लाँच केला होता. त्यावेळी तो एक्लिप्स ब्लॅक, नेबुला ग्रीन आणि लूनर ब्लू या कलर मध्ये लॉन्च करण्यात आला होता. त्याचबरोबर आत्ता लॉन्च करण्यात आलेला moto G30 हा रोज गोल्ड आणि सॅटिन मरून या कलर मध्ये लॉन्च करण्यात आला आहे.
मोटोरोला कंपनीच्या moto G32 हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट वर 26 जून पासून उपलब्ध होणार आहे. याची किंमत 11 हजार 999 रुपये एवढी असून moto edge 40 ची किंमत 29 हजार 499 रुपये एवढी आहे. पण हा मोबाईल तुम्हाला बँक ऑफरनुसार 27 हजार 999 रुपयाला मिळू शकतो.
moto G32 या स्मार्टफोन मध्ये आठ जीबी रॅम आणि 128 जीबी इंटर्नल स्टोरेज मध्ये उपलब्ध आहे. 6.5 इंचचा फुल HD+ रेजोल्यूशन आणि 90Hz रिफ्रेश रेटचा डिस्प्ले सह स्नॅपड्रॅगन 680 SOC मध्ये
उपलब्ध असून 50MP ट्रिपल-कॅमेरा सेटअप, 16MP सेल्फी कॅमेरा, 5,000mAh बॅटरी, 3.5 मिमी ऑडियो जॅक, स्टीरियो स्पीकर सेटअप, डॉल्बी एटमॉस सपोर्ट आणि IP52 रेटिंग या फीचर्स ने परिपूर्ण असा हा स्मार्टफोन आहे.