टाइम्स मराठी । फोर्टेबल मोबाईल मार्केटमध्ये त्यांचे वर्चस्व गाजवत आहे. या फोर्टेबल मार्केटमध्ये सॅमसंग बऱ्याच काळापासून असून ओपो आणि टेक्नो सारख्या कंपन्या देखील आता फोर्टेबल स्मार्टफोन बनवण्यामध्ये आपलं पाऊल टाकत आहे. या सोबतच आता मोटोरोला या कंपनीने जबरदस्त डिस्प्ले आणि कॅमेरा सह दोन नवीन फ्लिप फोन लॉन्च केले आहे. Motorola Razr 40 Ultra आणि Razr 40 असं या दोन्ही मोबाईलची नावे आहेत. आज आपण दोन्ही स्मार्टफोनचे खास फीचर्स आणि किंमत याबाबत जाणून घेणार आहोत.
फीचर्स –
Motorola Razr 40 ultra मध्ये 165hz रिफ्रेश रेट आणि 1200 निट्स ब्राईटनेस यासह 6.9 इंच फोल्डेबल PoLED डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याचबरोबर आऊटर साईडने 144hz रिफ्रेश डेट सह 3.6 इंचाचा PoLED डिस्प्ले यामध्ये मिळतोय. या मोबाईलच्या कॅमेरा बद्दल बोलायचं तर प्रायमरी कॅमेरा 12MP आणि अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा 13 MP तसेच सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाहुला 32MP सेल्फी कॅमेरा आहे. या मोबाईलची बॅटरी 3800mAh एवढी असून ती 30w वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते.
Motorola Razr 40 या मोबाईल बद्दल बोलायचं तर या अफोर्डेबल फ्लिप फोन मध्ये 144hz रिफ्रेश रेट, HD + रिझोल्यूशन आणि 6.9 इंचाचा PoLED डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच आऊटर साईडने 1.5 इंचाचा डिस्प्ले आणि snapdragon 7 gen 1 प्रोसेसर यासारखे फिचर यामध्ये आहेत. मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास 64 MP प्रायमरी कॅमेरा, 12MP अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी 32MP चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. या मोबाईल मध्ये 4200 mAh ची बॅटरी असून ती 30 w फार चार्जिंगला सपोर्ट करते.
किमती किती ?
Motorola Razr 40 ultra या मोबाईलची किंमत 89,999 रुपये ठेवण्यात आली असून हा मोबाईल 8 GB रॅम आणि 256 GB स्टोरेजमध्ये उपलब्ध आहे. हा मोबाईल तुम्हाला वायवा मॅग्नेटा आणि इनफिनाइट ब्लॅक कलर मध्ये खरेदी करता येईल. जर तुम्ही आयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्ड वरून हा मोबाईल खरेदी करत असाल तर तुम्हाला हा फोन फक्त 7 हजार रुपयांच्या इस्टंट डिस्काउंट वर मिळू शकतो. त्याचबरोबर तुम्हाला हा मोबाईल मोबाईल 999 रुपयात अमेझॉन वरून प्री बुक करता येऊ शकते.
तर दुसरीकडे Razr 40 या मोबाईलची किंमत 59,999 रुपये असून आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्ड वरून हा खरेदी केल्यास 5 हजार रुपयाच्या इन्स्टंट डिस्काउंट मिळू शकतो. या मोबाईल मध्ये सुद्धा 8GB रॅम आणि 256 GB स्टोरेज मध्ये उपलब्ध आहे. हे दोन्ही मोबाईल 14 जुलै पासून अमेझॉन इंडिया आणि कंपनीच्या ऑफिशियल वेबसाईट वरून तुम्ही खरेदी करू शकता.