Motorola Razr 40 Ultra : या नव्या मोबाईलमध्ये आहेत दमदार फीचर्स; 4K कॅमेरा, 12 GB RAM अन बरंच काही…

टाइम्स मराठी ऑनलाईन । मोटोरोला कंपनी सध्या नवीन Motorola Razr 40 Ultra लाँच करण्याच्या तयारीत आहे. १ जुन ला हा नवीन फोन जागतिक बाजारात लाँच झाला आहे. यापूर्वी हा फोन अमेरिकेत Motorola razr+ आणि चीनमध्ये Motorola Moto Razr 2023 या नावाने विकला जातो आहे. भारतात मोबाईल लाँच होण्याआधीच कंपनीने जाहिरात फलक प्रसिद्ध केले. बल्गेरियाच्या सोफिया प्रदेशात झालेल्या या जाहिरातीत नव्या फोन चे बरचसे फीचरस दिसत आहेत. नव्याने लाँच झालेल्या फोनची बाजारात चर्चा सुरु आहे. तर चला या फोनबद्दल अजून माहिती जाणून घेऊ.

   

Motorola Razr 40 Ultra मध्ये काय विशेष आहे ?

आज बाजारात रोज अनेक फोन येत असतात पण प्रत्येक फोन त्याच्या फीचर्समुळे वेगळा ठरतो. मोटोरोलाच्या या फोनमध्ये काय खास आहे ते आपण बघू. कंपनीने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमध्ये फोनचे डिझाईन आणि कव्हर डिस्प्लेवरील दोन कॅमेरा दिसत आहेत. Motorola Razr 40 Ultra हा फ्लिप फोन आहे. त्यामुळे या नव्या स्टायलिश फोनला ६.९ इंच डिस्प्लेसह ३.६ इंच कव्हर डिस्प्ले देखील असेल.

फास्ट चार्जिंगसह पॉवरफुल प्रोसेसर

फोनमध्ये १२ जीबी रॅम तसेच ३० वॅट फास्ट चार्जिंग असेल. ज्यामुळे फोन लवकर चार्जे होईल व जास्त काळ बॅटरी बॅकअप देईल. स्नैपड्रैगन 8 प्लस जेन 1 हा पॉवरफुल प्रोसेसर फोनला सपोर्ट करेल. तसेच ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज दिला जाणार आहे आणि अँड्रॉइड १३ ऑपरेटिंग सिस्टमवर हा फोन चालेल.

सर्वोत्तम कॅमेरा आणि इतर फीचर्स उपलब्ध

फोटोग्राफीसाठी दोन मागील कॅमेरे असणार आहेत जे ४k व्हिडीओ रेकॉर्डिंग करू शकतात. तर सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सएलचा कॅमेरा आहे. याशिवाय फोनच्या बाजूला असलेले फिंगर सेन्सर , ३८००mah बॅटरी,ड्युअल सिम कार्ड वायरलेस चार्जिंग स्टिरिओ सेटअप, वॉटर अँड डस्ट रेसिस्टंट यासारखे फीचर्स फोनमध्ये असणार आहेत. रिपोर्टनुसार Motorola Razr 40 Ultra मॅजेन्टा, इन्फिनिटी ब्लॅक आणि ग्लेशियर ब्लू या रंगात उपलब्ध असेल.त्याची किंमत EUR 1169 ते 1199 च्या दरम्यान असू शकते.