अबब! मुकेश अंबानींनी खरेदी केली Mercedes S680 गार्ड; किंमत ऐकूनच फुटेल घाम

टाइम्स मराठी । जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये मुकेश अंबानी यांचे नाव घेतले जाते. विशेष म्हणजे, त्यांच्याकडे जगातील सर्वात बेस्ट लक्झरी गाड्यांचे देखील कलेक्शन आहे. या लक्झरी गाड्यांमध्ये आता आणखीन एका गाडीचा समावेश झाला आहे. आता मुकेश अंबानी यांनी मर्सिडीज S680 गार्ड ही कार खरेदी केली आहे. सर्वात आलिशान आणि महागडी असणारी ही कार बुलेटप्रूफ आहे. मुकेश अंबानी यांच्या मर्सिडीज S680 गार्ड कारची किंमत तब्बल 10 कोटी रुपये आहे. या मर्सिडीज S680 मध्ये VR10 स्तरावरील सुरक्षा प्रणाली वापरण्यात आली आहे. त्यामुळे या कारवर जरी कोणी हल्ला केला तरी मुकेश अंबानींना कोणतीही इजा होणार नाही. ही कार इतर मर्सिडीजसारखी दिसत असली तरी यामध्ये काही विशेष सुविधा पुरविण्यात आल्या आहेत.

   

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मर्सिडीज S680 वर कोणत्याही बॉम्बचा किंवा हल्ल्याचा परिणाम होत नाही. ही कार सहज कोणत्याही शस्त्राचा आणि आगीचा सामना करू शकते. तर 2 मीटर अंतरावरून 15 किलो वजनाचा टीएनटी स्फोटही मर्सिडीज S680 कसलाच परिणाम करू शकत नाही. ही कार इतर मर्सडीज कारपेक्षा 2 टनांनी जास्त जड आहे. मर्सिडीज S680 गार्डला एका खास अशा स्टीलपासून बनवण्यात आले आहे. कंपनीने या कारमध्ये 6.0 लीटर क्षमतेचे V12 बाय टर्बोचार्ज केलेले पेट्रोल इंजिन दिले आहे. हे इंजिन 7-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन गिअरबॉक्सला जोडण्यात आलं असून 612 bHP पॉवर आणि 850 Nm टॉर्क जनरेट करते.

आजवर मुकेश अंबानी यांनी अनेक गाड्या खरेदी केल्या आहेत. मात्र मर्सिडीज S680 ही कार फक्त त्यांच्या संरक्षणासाठी खरेदी करण्यात आली आहे. मर्सिडीज S680 गार्ड बुलेटप्रूफ कारमध्ये अनेक उत्तमोत्तम वैशिष्ट्य समाविष्ट आहेत. या कारला पॉली कार्बोनेट लेपित खिडक्या आहेत. जर कोणी कारच्या खिडक्यांवर बंदूक चालवली तरी देखील या कारच्या खिडक्या फुटणार नाहीत. एकूणच काय तर, सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिशय मस्त असलेली ही कार कार अंबानी यांच्या ताफ्यात सामील झाली आहे.