Gmail मध्ये आलं मल्टी लँग्वेज फीचर; आता तुम्हाला हव्या त्या भाषेत ट्रान्सलेट करा मेल

टाइम्स मराठी । आजकाल सोशल मीडिया (Social Media) एप्लीकेशन वेगवेगळ्या प्रकारचे अपडेट्स आणि फीचर्स आणत असतात. या नवीन अपडेट्स आणि फीचर्स मुळे युजर्स ला मोठ्या प्रमाणात फायदा होत असतो. त्याचबरोबर वापरकर्त्यांचे कामही अगदी हलकं होत असते. याच पार्श्वभूमीवर गुगलने एक नवीन फिचर लाँच केलं आहे जे Gmail शी संबधित आहे. खरं तर आपल्याला बऱ्याचदा वेगवेगळ्या प्रकारचे ई- मेल येत असतात. किंवा हे ई मेल आपण देखील पाठवत असतो. मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्ही भाषेपैकी पैकी कोणत्याही भाषेत असलेले ई-मेल आपण सहजरीत्या वाचतो. परंतु जर वेगळ्याच भाषेत एखादा ईमेल आला असेल तर आपली चांगली तारंबळ उडते. आता या प्रॉब्लेम वर सुटका मिळवण्यासाठी ios आणि Android वर एक खास फीचर उपलब्ध आहे.

   

या फिचरचे नाव मल्टी लॅंग्वेज ट्रांसलेट फीचर आहे. गुगलने डेस्कटॉप वर्जनसाठी अगोदरच हे फीचर लॉन्च केले होते. परंतु आता हेच फिचर अँड्रॉइड आणि आयओएस यूजरसाठी रोलआऊट करण्यात आले आहे. या फीचर्सच्या माध्यमातून तुम्ही मेल 100 पेक्षा जास्त भाषांमध्ये ट्रांसलेट करू शकतात. परंतु तुम्ही एकावेळी एकच ईमेल ट्रान्सलेट करू शकतात. सध्या हे फिचर आणखीन डेव्हलप करणे सुरू आहे.

तुम्हाला देखील gmail वर मल्टी लँग्वेज ट्रान्सलेट हे फीचर वापरायचे असेल तर या टिप्स फॉलो करा.

1) सर्वात पहिले Gmail ॲप ओपन करा.
2) यानंतर तुम्हाला जो Gmail ट्रान्सलेट करायचा आहे त्यावर क्लिक करा. किंवा ओपन करा.
3) ओपन केल्यानंतर तुम्हाला ई-मेलच्या साईडला तीन डॉट दिसतील. त्यावर क्लिक करा.
4) त्यानंतर ट्रान्सलेट या ऑप्शन वर क्लिक करा.
5) आता तुम्हाला ट्रान्सलेट भाषा निवडावी लागेल.
6) त्यानंतर तुम्हाला तुमचा ईमेल हव्या त्या भाषेमध्ये मिळू शकतो.