Whatsapp Video कॉलिंग वेळी मिळणार म्युझिक शेअरिंग फीचर

टाइम्स मराठी । प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या Whatsapp मध्ये गेल्या काही महिन्यापासून एचडी फोटो शेअरिंग, कम्युनिटी ग्रुप, ग्रुप कॉलिंग, चॅनल, व्हॉइस कॉलिंग, ब्रॉडकास्ट लिस्ट  यासारखे वेगवेगळे फीचर्स उपलब्ध करण्यात आले आहे. यासोबतच Whatsapp आणखीन एक अप्रतिम फीचर्स युजर साठी उपलब्ध करणार आहे. या फीचरच्या माध्यमातून युजर्सला व्हिडिओ कॉलिंग करताना व्हिडिओ कॉल वर असलेल्या युजर सोबत म्युझिक शेअरिंग करण्याचा पर्याय मिळणार आहे.

   

ज्या प्रकारे Google Meet किंवा Zoom या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून व्हिडिओ कॉल वेळी ज्या प्रकारे स्क्रीन शेअरिंग करण्याचा ऑप्शन मिळतो, त्याचप्रमाणे व्हाट्सअप वर स्क्रीन शेअरिंग करताना म्युझिक ऑडिओ शेअर करण्याची देखील परवानगी मिळेल. यापूर्वी हे फीचर  iOS वर्जन 23.25.10.72 साठी व्हाट्सअप बीटा मध्ये उपलब्ध करण्यात आले होते.

जाणून घ्या काय आहे फीचर

Whatsapp फीचर ट्रॅकर वेबसाईट WABETAINFO ने दिलेल्या रिपोर्टनुसार, Whatsapp सध्या एका नवीन फिचर वर काम करत आहे. हे फीचर आयफोन युजर साठी  उपलब्ध करण्यात येणार आहे. या फीचर च्या माध्यमातून व्हिडिओ कॉलिंग करताना स्क्रीन शेअरिंग करण्यासोबतच ऑडिओ  शेअरिंग करण्याची परवानगी मिळेल. त्यानुसार जेव्हा एखादा युजर्स व्हिडिओ कॉल वर स्क्रीन शेअरिंग करेल त्यावेळी व्हिडिओ ऑडिओ किंवा म्युझिक रियल टाईम मध्ये शेअरिंग करण्याची क्षमता प्लॅटफॉर्मवर  इंटरॅक्शन वाढवेल. अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 या ठिकाणी वापरता येणार नाही हे फीचर

सध्या तरी या फिचरवर काम सुरू असून अजून बीटा टेस्टर साठी देखील उपलब्ध करण्यात आले नाही. या शेअर म्युझिक ऑडिओ फीचर व्हाट्सअप व्हॉइस कॉल सोबत काम करणार नाही. यासोबतच ज्या ठिकाणी व्हिडिओ कॉल अकार्यक्षम आहे त्या ठिकाणी देखील हे फीचर वापरता येणार नाही. Whatsapp ने व्हिडिओ कॉन्फरन्सिंग प्लॅटफॉर्म सोबत प्रतिस्पर्धा करण्यासाठी ऑगस्ट महिन्यात व्हिडिओ कॉलिंग मध्ये स्क्रीन शेयरिंग हे फीचर जोडले होते. त्यानंतर आता यामध्ये आणखीन एक फीचर ऍड होत आहे.