MXmoto M16 : 220 KM रेंजसह भारतात लाँच झाली इलेक्ट्रिक क्रूजर बाईक

MXmoto M16 । भारतात गेल्या वर्षभरापासून इलेक्ट्रिक गाडयांना मोठी पसंती पाहायला मिळत आहे. पेट्रोल- डिझेलच्या खर्चापासून सुटका मिळवण्यासाठी अनेकजण इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्याला आपलं प्राधान्य देत आहेत. इलेक्ट्रिक गाड्या दिसायला तर आकर्षक असतातच आणि खिशाला सुद्धा परवडतात त्यामुळे खास करून तरुणाईला या गाड्यांची चांगली भुरळ आहे. त्यामुळे बाजारात सर्वच कंपन्या एकामागून एक नव्या इलेक्ट्रिक गाड्या आणत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध कंपनी MXmoto ने भारतात लॉन्ग रेंज क्रूजर इलेक्ट्रिक बाईक M16 लाँच केली आहे. आज आपण या कृजर बाईकचे खास फीचर्स आणि तिच्या किमतीबाबत सविस्तर जाणून घेऊयात….

   

लूक आणि डिझाईन –

गाडीचा लूक बघितला तर दिसायला हि कृजर बाईक अतिशय आकर्षक आहे. बघता क्षणीच तुम्ही या इलेक्ट्रिक बाईकच्या प्रेमात पडाल. गाडीला एलईडी लाइटिंग आणि सिंगल पीस सीटसह गोल आकाराचे हेडलॅम्प आहेत. तर एम-आकाराचे हँडलबार आणि आरामदायी राइडिंग पोझिशनमुळे ही इलेक्ट्रिक बाईक अतिशय कम्फर्टेबल वाटते. गाडीच्या इंधन टाकीच्या खाली बॅटरी आणि इलेक्ट्रिक मोटर जोडलेली आहे. या इलेक्ट्रिक बाइकमध्ये तुम्हाला 17 इंचाचे मोठी चाके मिळतात. ज्यामुळे तुम्ही कोणत्याही रस्त्यावर अगदी आरामात ही इलेक्ट्रिक कृजर बाईक चालवू शकता.

रेंज किती ? MXmoto M16

MXmoto M16 या इलेक्ट्रिक बाइकमध्ये कंपनीने 4,000 वॅटची BLDC हब मोटर बसवली असून ती 140Nm टॉर्क जनरेट करते. यात 80 AMP चा हाई इफिशिएंसी कंट्रोलर देखील आहे जो रीजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टमसह पॉवर आउटपुट 16% वाढवतो. एकदा ही बाईक फुल्ल चार्ज करण्यासाठी 1.6 युनिट वीजेचा वापर होईल आणि अवघ्या 3 तासांपेक्षा कमी वेळेत ही इलेक्ट्रिक कृजर बाईक 0 ते 90 टक्के चार्ज होईल. एकदा फुल्ल चार्ज झाल्यानंतर ही बाईक 160-220 किमी अंतर सहज पार करेल असा दावा कंपनीने केला आहे.

अन्य फीचर्स –

गाडीच्या अन्य फिचर बाबत सांगायचं झाल्यास, MXmoto M16 मध्ये डायनॅमिक एलईडी हेडलाइट्स, LED डायरेक्शन इंडिकेटर्स, क्रूझ कंट्रोल, ट्रिपल डिस्क ब्रेकिंग सिस्टम, नेक्स्ट लेव्हल ईव्ही कनेक्टिव्हिटी, अँटी स्किड असिस्ट, पार्किंग असिस्ट, रिव्हर्स असिस्ट, ऑन बोर्ड नेव्हिगेशन, ऑन राइड कॉलिंग आणि ब्लूटूथ साउंड सिस्टम यांसारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

किंमत-

MXmoto M16 या इलेक्ट्रिक कृजर बाईकची सुरुवातीची किंमत 1,98,000 रुपये (एक्स-शोरूम) आहे. कंपनीने या बाईकच्या बॅटरीवर 8 वर्षांची वॉरंटी दिली आहे. याशिवाय मोटरवर 80,000 किमीची वॉरंटी आणि कंट्रोलरवर 3 वर्षांची वॉरंटी देण्यात आली आहे.