Nag Panchami 2023 : उद्या नागपंचमी, काय आहे महत्व? पहा तिथी आणि शुभ मुहूर्त

टाइम्स मराठी । उद्या 21 ऑगस्ट असून श्रावणातील पहिला सण म्हणजे नागपंचमी (Nag Panchami 2023) उद्या साजरी केली जाते. हिंदू पंचांगानुसार, श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी दरवर्षी नागपंचमी साजरी केली जाते. आपल्या कुटुंबाची नाग भयापासून सदासर्वकाळ मुक्तता व्हावी, तसेच नागदेवतेचा कृपाशीर्वाद प्राप्त व्हावा, यासाठी प्रतिवर्षी श्रावण शुक्ल पक्ष पंचमीला म्हणजेच नागपंचमीला नागाची पुजा केली जाते. या दिवशी नागाची पुजा करणाऱ्या व्यक्तींना भय राहत नाही असं म्हंटले जाते.

   

मुहूर्त – (Nag Panchami 2023)

यंदाची नागपंचमी 21 ऑगस्ट 2023 सोमवारी आहे. त्यानुसार शुक्ल पक्षाची पंचमी तिथी रात्री 12 वाजून 23 मिनिटांनी प्रारंभ होईल. तर पूजेचा शुभ मुहूर्त पहाटे 5 वाजून 53 मिनिटांपासून ते सकाळी 8 वाजून 30 मिनिटांपर्यंत आहे. 22 ऑगस्ट 2023 रोजी मंगळवार दुपारी 2 वाजता नागपंचमी तिथी समाप्त होईल.

काय आहे पौराणिक कथा –

राजा जनमेजय नागांच्या संपूर्ण वंशाचा नाश करण्यासाठी यज्ञ करतो. हे त्यांचे वडील राजा परीक्षित यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी होते, जे तक्षक सापाच्या प्राणघातक चाव्याला बळी पडले. प्रसिद्ध अस्तिक ऋषी जनमजेयांना यज्ञ करण्यापासून रोखण्यासाठी आणि सर्पांचे यज्ञ वाचवण्याच्या शोधात निघाले. त्यानंतर सर्पयज्ञ करणार्‍या जनमेजय राजाला आस्तिक ऋषींनी प्रसन्न करून घेतले. जनमेजयाने ‘वर मागा’, असे म्हटल्यावर सर्पयज्ञ थांबवण्याचा वर त्यांनी मागून घेतला. जनमेजयाने सर्पयज्ञ थांबवला, तो दिवस पंचमीचा होता. जो आज संपूर्ण भारतात नागपंचंमी म्हणून ओळखला जातो .

यंदाची नागपंचमी (Nag Panchami 2023) ही सोमवारच्या शुभ मुहूर्तावर जुळून आली आहे. सोमवार हा महादेव शंकराचा वार म्हणून ओळखला जातो, श्रावणी सोमवारचे महत्त्व तर अगदी खास आहेच. त्यामुळे यंदाची नागपंचमी सुद्धा विशेष महत्वाची आहे.

नागपंचमीच्या दिवशी काय करावे ?

नागपंचमीच्या दिवशी चांदीपासून बनवलेल्या नाग-नागिणीची जोडी बनवा. याची पुजा करा आणि त्यानंतर पाण्यात सोडून द्या.

ज्यांना नागदेवतेची ‘षोडशोपचार पूजा’ करणे शक्य नाही, त्यांनी ‘पंचोपचार पूजा’ करावी. दूध, साखर, लाह्या यांचा नैवेद्य दाखवावा.

नागपंचमीच्या दिवशी उपवास करा. वृत केल्याने कालसर्प पासून मुक्ती मिळते.

पूजेवेळी ‘नमो स्तु सर्पेभ्यो ये के च पृथ्वी मनु!’ ये अंतरिक्षे ये दिवि तेभ्य: सर्पेभ्यो नम:! या मंत्राचा जप करा.

नागपंचमीच्या दिवशी पितळेच्या पाण्याने शंकराला जल अर्पण करावे

नागपंचमीच्या दिवशी खालील गोष्टी करू नका –

नागपंचमीच्या दिवशी काहीही चिरू- कापू नये.

या दिवशी तळलेले पदार्थ करु नका किंवा चुलीवर तवा ठेवून काही भाजू नका

या दिवशी दिंड, पातोळया, मोदक असे उकडून केले जाणारे पदार्थ करा.

शक्यतो वाद किंवा हिंसा टाळावी