Name Astrology : ‘या’ नावाच्या व्यक्तींवर असते कुबेर देवाची कृपा; ना कसलं टेन्शन, ना पैशाची कमतरता

टाईम्स मराठी । ज्योतिष शास्त्रामध्ये व्यक्तीच्या नावाचं (Name Astrology) खास महत्व आहे. व्यक्तीच्या नावाचा त्यांच्या स्वभाव आणि भविष्यावर जास्त परिणाम दिसत असतो. व्यक्तीच्या जन्मतारखेनुसार आणि तिच्या स्थानानुसार रास ठरवल्या जाते. आणि या रासनुसार व्यक्तीचे नाव ठेवले जात असते. त्याचप्रमाणे ज्योतिष शास्त्रानुसार व्यक्तीच्या नावाच्या पहिल्या अक्षराने त्याच्या स्वभावाची आणि भविष्याची गणना होत असते. नावाच्या पहिल्या अक्षरावरून त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व समजून घेणे सोपे जाते. त्याचबरोबर ज्योतिष शास्त्रानुसार काही खास अक्षरांवर कुबेर देवाचा खास आशीर्वाद असतो. अशा अक्षरांपासून सुरू होणाऱ्या नावाच्या व्यक्तींवर कधीच पैशांसंबंधीत समस्या येत नाही. ते लोक राजासारखं जीवन जगतात. चला तर जाणून घेऊया….

   

A अक्षर-

ज्योतिष शास्त्रानुसार A या अक्षरा (Name Astrology) पासून नाव सुरू होत असलेला व्यक्ती भाग्यशाली असतो. त्याचबरोबर या व्यक्ती मेहनती, इमानदार आणि स्वाभिमानी असतात . A नावाच्या व्यक्तींमध्ये नेतृत्व गुण असतात त्यामुळे ते कोणत्याही क्षेत्रात उच्च स्थान कमावू शकतात. भगवान कुबेरांची त्यांच्यावर खास कृपा असते.

S अक्षर- (Name Astrology)

ज्योतिष शास्त्रानुसार S अक्षरापासून सुरू होणाऱ्या नावाच्या व्यक्तीच्या आयुष्यात कुबेर देवाची कृपा सदैव असते. त्याचबरोबर या नावाचे व्यक्ती बुद्धिमान आणि मेहनती असतात.

B अक्षर-

ज्योतिष शास्त्रानुसार B या अक्षरापासून (Name Astrology) सुरू होणाऱ्या नावाच्या व्यक्ती मेहनती आणि बुद्धिमानी असतात. त्याचबरोबर ते जे काम हाती घेतात ते पूर्ण केल्याशिवाय म्हणजेच यशस्वी झाल्याशिवाय सोडत नाही. या नावाच्या व्यक्ती कधीच कोणाच्या भरोशावर बसत नाही. त्याचबरोबर ते त्यांची स्वतःचे नशीब स्वतःच बनवतात. ते त्यांच्या जीवनात खूप पैसा संपत्ती कमवतात.

K अक्षर-

ज्योतिष शास्त्रानुसार K या अक्षरापासून सुरू होणाऱ्या नावाच्या व्यक्ती त्यांच्या आयुष्यात खूप पैसा आणि संपत्ती कमावतात. त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती चांगली राहते. या अक्षरापासून सुरू होणाऱ्या नावांच्या व्यक्तींवर कुबेर देवाची खास कृपा असते.

N अक्षर-

ज्योतिष शास्त्रानुसार N या अक्षरापासून सुरू होणाऱ्या नावाच्या व्यक्ती सतत खुश राहणाऱ्या व्यक्तीपैकी एक आहे. या व्यक्ती त्यांच्या आयुष्यात खूप मेहनत करतात. N नावाच्या व्यक्तींवर भगवान कुबेर देवाची सदैव कृपा असते. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात सुख सुविधाची कोणतीही कमतरता नसते.