Name Astrology : ‘या’ नावाची लोक असतात खूप बुद्धिमान; मात्र हट्टी स्वभाव येऊ शकतो अंगलटी

टाइम्स मराठी । ज्योतिष शास्त्रामध्ये व्यक्तीच्या नावाचं (Name Astrology) खास महत्व आहे. व्यक्तीच्या नावाचा त्यांच्या स्वभाव आणि भविष्यावर जास्त परिणाम दिसत असतो. व्यक्तीच्या जन्मतारखेनुसार आणि तिच्या वेळेनुसार रास ठरवली जाते. आणि या रासनुसार व्यक्तीचे नाव ठेवले जात असते. त्याचप्रमाणे ज्योतिष शास्त्रानुसार व्यक्तीच्या नावाच्या पहिल्या अक्षराने त्याच्या स्वभावाची आणि भविष्याची गणना होत असते. नावाच्या पहिल्या अक्षरावरून त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व समजून घेणे सोपे जाते.

   

जर एखाद्या व्यक्तीकडे स्वतःची कुंडली नसेल तर बरेच जण ज्योतिषांकडून नावाच्या पहिल्या अक्षरावरून करिअर जीवन याबाबत गोष्टी जाणून घेत असतात. ज्योतिष शास्त्राच्या मदतीने विना कुंडली नावाच्या पहिल्या अक्षरावरून जीवनात होणारे बदल काही गोष्टी जाणून घेणे सोपे जाते. त्यानुसारच आज आपण अशा काही नावांबद्दल बोलणार आहोत ज्यांच्या पहिल्या अक्षरावरून त्यांचा स्वभाव वागणूक समजू शकते.

Y अक्षरापासुन नाव सुरू होणारे व्यक्ती– Name Astrology

Y अक्षरापासून नाव सुरू होत असलेल्या व्यक्ती या स्वभावाने खूप हुशार असतात. या लोकांना कोणाचेही ऐकणे आवडत नाही. यासोबतच त्यांच्या स्वभावाबद्दल बोलायचं झालं तर ते हट्टी आणि चिडखोर देखील असतात. एवढेच नाही तर आळशी देखील असतात. Y अक्षरापासून सुरू होणाऱ्या नावांच्या लोकांना विलासी पद्धतीने जगणे आवडते. असे व्यक्ती कोणाची ऐकतही नाही आणि नियंत्रणातही राहत नाहीत. असे व्यक्ती करिअरमध्ये खूप संघर्ष करतात पण बुद्धिमान देखील असतात.

महागड्या गाड्या घेण्याचा शौक

Yअक्षरापासून सुरू होणाऱ्या नावांच्या व्यक्ती (Name Astrology) आयुष्यामध्ये खूप काही मिळवतात पण नीट टिकवून ठेवत नाहीत. ते सर्व गोष्टींचा नाश करतात. या लोकांना महागड्या गाड्या घेण्याचा प्रचंड शॉक असतो. यासोबतच खाणे पिणे प्रवास करणे देखील त्यांना प्रचंड आवडते.

वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ आवडत नाही

वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर ते प्रेम प्रकरणात त्यांची फसवणूक झाल्यावर पूर्णपणे तुटतात. यासोबतच त्यांना वाईट सांगतही लागते. या सोबतच अशा व्यक्तींना एकटे राहायला आवडते त्यांच्या आयुष्यात त्यांना कुणाचीही ढवळाढवळ आवडत नाही. त्यानुसार त्यांच्या आयुष्य वैयक्तिक ठेवणे त्यांना जास्त पसंत असते.