टाइम्स मराठी । मेसेजिंग प्लॅटफॉर्म म्हणून ओळख असलेल्या Whatsapp ने मागच्या आठवड्यामध्ये Whatsapp Channel हे फीचर लॉन्च केलं. हे फिचर भारतासोबतच 150 देशांमध्ये लॉन्च करण्यात आले आहे. या माध्यमातून एकाच वेळी अनेक लोकांशी संवाद साधला जाऊ शकतो. आता व्हाट्सअपच्या या लेटेस्ट फीचरच्या माध्यमातून तुम्ही थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासोबत जोडले जाऊ शकता आणि त्यांच्याशी संवादही साधू शकता. आपल्या सर्वांना माहिती आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चाहते प्रचंड प्रमाणात असून Twitter, Instagram, आणि Facebook यासारख्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर पीएम मोदी उपलब्ध आहेत. नुकतच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हाट्सअप चॅनेल जॉईन केले आहे. त्यामुळे आता व्हाट्सअपवर मोदींसोबत संवाद साधू शकतो. नरेंद्र मोदी यांनी व्हॉट्सॲप चॅनेलवर पोस्ट केलं आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं की, व्हॉट्सॲप कम्युनिटीमध्ये सहभागी होण्यास उत्सुक आहे. संवाद साधण्याच्या वाटचालीत आणखी एक पाऊल आहे.
तुम्ही देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फॉलो आणि त्यांच्याशी संवाद साधू इच्छित असाल तर तुम्हाला व्हाट्सअप अपडेट करावे लागेल आणि त्यानंतर तुम्हाला त्यावर व्हाट्सअप चैनल दिसतील. यंत्र तुम्ही फाइंड चॅनल्स या ऑप्शन वर क्लिक करा. या ऑप्शनच्या माध्यमातून तुम्ही सेलिब्रिटी शोधू शकतात. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी असं तुम्हाला यावर सर्च करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला नरेंद्र मोदी यांचे चॅनेल दिसेल. तुम्ही तुमचे व्हाट्सअप अपडेट करून देखील तुम्हाला व्हाट्सअप चैनल फीचर दिसत नसेल तर तुम्हाला काही दिवस वाट बघावी लागेल. कारण हे फीचर सध्या हळूहळू यूजर्स पर्यंत पोहोचत आहे. आणि यासाठी वेळ लागत आहे.
व्हाट्सअप चैनल या फीचर च्या माध्यमातून तुम्ही एक्टरेस, सेलिब्रिटीजला जोडले जाऊ शकतात. परंतु तुम्ही त्यांना मेसेज करू शकत नाही. तुम्हाला फक्त प्रत्येक सेलिब्रिटीचे अपडेट मिळतील. या चॅनेलवर फॉलोवर्स म्हणून तुमचा फोन नंबर आणि प्रोफाइल फोटो इतर फॉलोवर्सला दाखवला जाणार नाही. त्याचबरोबर तुम्हाला कोणाला फॉलो करायचे आहे हे तुम्हाला निवडावे लागेल. या चॅनलची हिस्ट्री फक्त 30 दिवसांसाठी सेव करण्यात येईल त्यानंतर हिस्ट्री रिमूव होईल. व्हाट्सअप च्या या चॅनलच्या माध्यमातून कंपन्या देखील ग्राहकांसोबत जोडल्या जातील. या चॅनेलचा वापर ब्रॉडकास्टिंग टूल्स म्हणून केला जाऊ शकतो. व्हाट्सअप चॅनेल सध्या खाजगी प्रसारण सेवा म्हणून डिझाईन करण्यात आले आहे.
काय आहे हे फिचर–
व्हाट्सअपच हे नवीन अपडेटेड फीचर्स असून या फीचरच्या माध्यमातून तुम्हाला ॲप मध्ये वेगवेगळ्या महत्त्वाच्या गोष्टी का लाभ मिळेल. इंस्टाग्राम वर ज्याप्रमाणे आपण आपल्या आवडत्या ॲक्टर एक्ट्रेस ला फॉलो करतो त्याचप्रकारे आता व्हाट्सअप वर देखील आपण आपल्या आवडीच्या अभिनेत्याला किंवा अभिनेत्रीला तसेच क्रिकेटपटूंना फॉलो करू शकतो. .
मेटाने लॉन्च केलेले हे whatsapp चॅनेल काही आठवड्यांमध्ये जागतिक स्तरावर सुरू करण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी सांगितलं. मेटाच्या या नवीन फीचर मुळे तुम्ही वेगवेगळे चॅनल शोधू शकतात. या चॅनेलवर भारतासोबतच जगातील काही सेलिब्रिटी क्रिकेटपटू कलाकार या चॅनलवर आधीपासूनच उपस्थित असणार आहे जर तुम्ही देखील या फिचर चा लाभ घेऊ इच्छित असाल तर ही प्रोसेस फॉलो करा.
1) गुगल प्ले स्टोअर वर जा.
2) तुमचे व्हाट्सअप अपडेट करा.
3) त्यानंतर तुम्ही व्हाट्सअप ओपन करा. व्हाट्सअप च्या स्क्रीन खाली तुम्हाला अपडेट्स टॅब मिळेल. त्यावर क्लिक करा.
4) यानंतर तुम्हाला काही चॅनल दिसतील. त्यापैकी कोणतेही चॅनल तुम्ही फॉलो करू शकतात.
5) फॉलो करण्यासाठी तुम्हाला चॅनल समोर दिलेल्या + या सिम्बॉल वर क्लिक करावे लागेल.