Narzo N53 नव्या स्टोरेज व्हेरिएन्टमध्ये लाँच; पहा किंमत

टाइम्स मराठी । फेस्टिवल सिझनच्या निमित्ताने  Realme ने भारतीय बाजारपेठेमध्ये नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. Realme Narzo N53 असे या मोबाईलचे नाव असून हा मोबाईल नव्या स्टोरेज व्हेरिएन्टमध्ये लाँच करण्यात आलाय. यापूर्वी हा मोबाईल भारतीय बाजारपेठेमध्ये 4 GB रॅम आणि 6 GB रॅम वेरीएंट मध्ये उपलब्ध करण्यात आला होता. या स्मार्टफोनची किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी असल्यामुळे ग्राहकांनी या मोबाईलला चांगलंच पसंत केले होते. आता कंपनीने हा मोबाईल 8 GB रॅम मध्ये आणला आहे.

   

किंमत

Realme Narzo N53 या स्मार्टफोनच्या किमती बद्दल बोलायचं झालं तर 4GB रॅम आणि 64 GB इंटरनल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 8,999 रुपये आहे. यासोबतच 6 GB रॅम आणि 128 GB  स्टोरेज व्हेरिएंट ची किंमत 10,999 रुपये एवढी आहे.  आता कंपनीने लॉन्च केलेल्या 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज वेरियंट ची किंमत 11,999 रुपये ठेवण्यात आली आहे.

स्पेसिफिकेशन– Narzo N53

Realme Narzo N53 मध्ये 6.74 इंच चा वॉटर ड्रॉप नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 90 HZ रिफ्रेश रेट सह येतो. तसेच तुम्हाला या डिसप्ले मध्ये 180 HZ टच सॅम्पलिंग रेट, 450 निट्स ब्राईटनेस आणि 16.7 m कलर्स मिळतो . या स्मार्टफोन मध्ये कंपनीने Unisoc T612 ऑक्टाकोर प्रोसेसर दिला असून हा मोबाईल Android १३ वर आधारित OneUI वर काम करतो .

कॅमेरा

Realme Narzo N53 या स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्यानुसार स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर 77° FOV चा 50 मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. हा प्रायमरी कॅमेरा एक 5P लेन्स आहे. यासोबतच फ्रंट मध्ये 8 मेगापिक्सेल कॅमेरा उपलब्ध करण्यात आला आहे. हा फ्रंट कॅमेरा F/2.0 अपर्चरसह उपलब्ध आहे.

बॅटरी

Realme Narzo N53 या स्मार्टफोन मध्ये बॅकअप साठी 5000 mAh बॅटरी देण्यात आली असून ही बॅटरी 33 W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. त्याचबरोबर या मोबाईल मध्ये मध्ये रिव्हर्स चार्जिंग सपोर्ट देखील उपलब्ध आहे. मोबाईल मध्ये सेक्युरिटी साठी साईड पॅनलवर फिंगरप्रिंट सेंसर उपलब्ध करण्यात आला असून यासोबतच फेस अनलॉक फीचर्स देखील उपलब्ध आहे.