NASA चंद्रावर उभारणार माणसांची वसाहत; 2040 पर्यंत घरे बांधणार

टाइम्स मराठी । चांद्रयान तीन हे मिशन यशस्वी झाल्यानंतर प्रत्येकाच्या मनात वेगवेगळे प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. त्यानुसार काही व्यक्तींना आपण देखील आता चंद्रावर राहण्यासाठी जाणार की काय असे देखील प्रश्न पडत आहेत. एवढेच नाही तर बरेच व्यक्ती चंद्रावर जाण्याचे स्वप्न बघायला देखील लागले आहेत. अशातच NASA आता चंद्रावर घर बनवण्याची योजना आखत आहे. NASA चंद्रावर व्यक्तींना जास्त काळापर्यंत स्थायी ठेवण्याचा विचार करत आहे. यापूर्वी देखील नासाने Apolo 11 या मिशनच्या दरम्यान अंतराळविरांना 75 तासांसाठी चंद्रावर ठेवले होते. मात्र त्यानंतर कोणताच व्यक्ती चंद्रावर गेला नाही.

   

आता NASA ने 2040 पर्यंत चंद्रावर घर बनवण्याची योजना आखली आहे. याबाबत स्वतः नासाने खुलासा केला आहे. नासाच्या वैज्ञानिकांनी सांगितलं की, नासा चंद्रावर 3डी प्रिंटर पाठवण्याचा विचार करत आहे. याद्वारेच चंद्राच्या पृष्ठभागावर संरचना तयार केल्या जातील तसेच चंद्राची धूळ आणि रॉक चीप्स वापरून चंद्राचा काँक्रीट तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर या काँक्रीटचा वापर चंद्रावर पहिली इमारती बांधण्यासाठी होईल.

 न्यूयॉर्क टाइम्सला, NASA च्या टेक्नॉलॉजी मॅच्युरेशन डायरेक्टर निकी वर्कहेसर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही सध्या एका अहम क्षणी आहोत, बऱ्याच अर्थांनी आमचे स्वप्न सत्यात उतरेल अशी शक्यता आहे. यासोबतच चंद्रावर जाण्याची अनुभूती अत्यंत अप्रतिम असेल. चंद्राची धूळ घर बांधण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असेल असं शास्त्रज्ञांना वाटतं.  खरं तर चंद्राची धूळ अत्यंत विषारी आहे. परंतु पृथ्वीवर असलेल्या माती पासून घर बनवता येत असेल तर चंद्राच्या धुळीपासून देखील बनवता येईल असं नासाचं म्हणणं आहे.

अमेरिकाने अपोलो कार्यक्रमच्या माध्यमातून जुलै 1969 ते डिसेंबर 1972 या कालावधीमध्ये चंद्रावर  क्रूड मून लँडिंग केली होती. त्यानंतर कोणताच व्यक्ती चंद्रावर गेला नाही. परंतु आता नासाने आर्टेमिस नावाचे एक नवीन मिशन लॉन्च करण्याची तयारी सुरू केली आहे. या मिशनच्या माध्यमातून  बरेच व्यक्ती चंद्रावर जाऊ शकतील. यापूर्वी देखील आर्टेमिस 1 लॉन्च करण्यात आले होते. यानंतर आता आर्टेमिस हे 2 मिशन असेल. नासाच्या या आर्टेमिस 2 मिशनच्या माध्यमातून  चार अंतराळ वीरांना पाठवलं जाईल. हे मिशन नोव्हेंबर 2024 साठी बनवण्यात आले असून हे मिशन यशस्वी झाल्यानंतर आर्टेमिस 3 लॉन्च करण्यात येईल. आणि या मिशनमध्ये  50 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तींना चंद्रावर पाठवण्यात येईल. नासाने  2040 चे लक्ष पूर्ण करण्यासाठी ऑस्टिन टेक्सास येथील एका टेक्नॉलॉजी फर्म आयकॉन सोबत पार्टनरशिप केली आहे.