Navratri 2023 : नवरात्री 9 दिवसांचीच का असते? काय आहे यामागील कारण?

टाइम्स मराठी । शारदीय नवरात्र (Navratri 2023) पूर्णपणे नऊ दिवसांची असते. नवरात्र मध्ये नऊ रंग, नऊ देवींची पूजाआर्चना. या सणाला प्रत्येक ठिकाणी उत्साहाचे वातावरण बघायला मिळते. यावर्षी नवरात्र 15 ऑक्टोबर पासून ते 23 ऑक्टोबर पर्यंत असणार आहे. नवरात्रीमध्ये माता जगदंबेची नऊ रुपये बघायला मिळतात. आणि दहाव्या दिवशी दसरा हा सण साजरा केला जातो. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी प्रत्येक घरामध्ये घटस्थापना केली जाते. आणि पूर्ण नऊ दिवस महिला उपवास ठेवतात. बरेच व्यक्ती या दिवसांमध्ये फलाहार करून उपवास धरतात. तुम्हाला प्रश्न पडला असेल की नवरात्री नऊ दिवसच का असते. चला तर जाणून घेऊयात मागचे कारण.

   

नवरात्र का साजरी करतात– Navratri 2023

नवरात्र साजरी (Navratri 2023) करण्यासाठी दोन महत्त्वाचे कारण आहेत. त्यानुसार पहिले कारण म्हणजे, आई दुर्गेचे महिषासुर सोबत नऊ दिवस युद्ध सुरू होते. या युद्धानंतर दहाव्या दिवशी असुराचा वध दुर्गामातेने केला होता. म्हणून नऊ दिवस आणि दहाव्या दिवशी विजयादशमीचा सण साजरा केला जातो. त्याचबरोबर श्री रामाने देखील दसऱ्याच्या दिवशी रावणाचा वध केला होता. त्यामुळे या विजयादशमीच्या सणाला दसरा देखील म्हटलं जातं. नवरात्र साजरी करण्याचे दुसरे कारण म्हणजे, माता दुर्गेने नऊ महिन्यांपर्यंत कटर म्हणजेच वैष्णव देवीच्या गृहेमध्ये तपश्चर्या केली होती. आणि ही तपश्चर्या करत असताना हनुमानजी ने या गृहेच्या बाहेर पहारा दिला होता. त्यानंतर हनुमानाची आणि भैरवनाथांचे युद्ध झाले. आणि त्यावेळी दुर्गामातेने गृहेतुन बाहेर येत भैरवनाथांचा वध केला. त्यामुळे नवरात्र साजरी केली जाते.

नवरात्र 9 दिवस का असते

नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये निसर्गामध्ये वेगवेगळे बदल होताना दिसतात. त्याचबरोबर शरीरामध्ये आणि अंतकरणांमध्ये देखील बरेच बदल होत असतात. त्याचबरोबर चैत्र आणि अश्विनच्या नवरात्रच्या वेळी ऋतुमान बदलत असते. या ऋतूचे आपल्या जीवनामध्ये, विचारात आणि धर्मामध्ये महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे ऋषीमुनींनी हिवाळा आणि उन्हाळा या दोन ऋतूंच्या मिलनाच्या काळाला नवरात्र म्हटले आहे. त्यानुसार जर आपण नवरात्री म्हणजे नऊ दिवस अन्न त्याग करून भक्ती, पूजा अर्चना केल्यामुळे मन आणि शरीर आयुष्यभर निरोगी राहते.

देवीचे 9 रूपे

नवरात्रामध्ये (Navratri 2023) नऊ दुर्गेची पूजा केली जाते. यामध्ये शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कृष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धीदात्री, हे नवदुर्गाचे नऊ रूप आहेत. काही लोक या रुपांना अंबिकेचा अध्यात्मिक रूप मानतात तर काहीजण पार्वतीचे रूप मानतात. नवदुर्गेच्या पहिल्या रूपाला पर्वतराज हिमालयाची मुलगी असल्यामुळे शैलपुत्री असे नाव देण्यात आले आहे. नवदुर्गेच्या दुसऱ्या रूपाला ब्रह्मचारणी म्हटले जाते. ब्रह्मचारणी देवीने तपश्चर्या करून शिवाला प्राप्त केले. चंद्रघंटा या देवीच्याडोक्यावर चंद्राकार टिळक आहे त्यामुळे तिला चंद्रघंटा देवी म्हटलं जातं. ओटी पोटापासून ते अंड्यापर्यंत संपूर्ण ब्रह्मांडाला समाविष्ट करणारी कृष्मांडा म्हणून ओळखली जाते.

कार्तिकेचे नाव स्कंद आहे म्हणून स्कंदमाता. यज्ञाच्या अग्नीत भस्मसात झाल्यावर महर्षी कात्यायनाच्या तपश्चर्येला प्रसन्न होऊन त्यांच्या घरात मुलीचा जन्म झाला म्हणून कात्यायनी असे म्हटले जाते. कात्यायनी देवीनेच महिषासुराचा वध केला होता. म्हणून त्यांना महिषासुरमर्दिनी म्हणतात. त्याचबरोबर या देवीचे नाव तुळजाभवानी देखील आहे. देवी आई पार्वती काळ म्हणजे प्रत्येक संकटाचा नाश करणारी म्हणून या देवीला काल यात्री असं म्हटलं जातं. आईचा रंग पूर्णपणे गौर म्हणजे पांढरा आहे. त्यामुळे महागौरी देखील म्हणतात. जे भाविक भक्त पूर्णपणे त्यांचीच भक्ती करतात, अशा भक्तांना सर्व प्रकारची सिद्धी देवी आई देत असते. त्यामुळे ती सिद्धीदात्री म्हणून ओळखली जाते.