Whatsapp वर बिझनेससाठी लवकरच सुरू होणार नवीन फीचर; अशा पद्धतीने करेल काम

टाइम्स मराठी । Meta कडून वेगवेगळे फीचर्स Whatsapp मध्ये ऍड करण्यात येतात. कंपनी व्हाट्सअप मध्ये ऍड करत असलेले फीचर्स यूजर्स ला व्हाट्सअँप वापरण्यासाठी मजेशीर अनुभव प्रदान करतात. पूर्वी व्हाट्सअप हे फक्त मेसेंजर होते. परंतु आता व्हाट्सअप मध्ये असलेल्या फीचर्स मुळे इन्स्टंट मेसेंजर बनले आहे. व्हाट्सअप च्या माध्यमातून आता पर्सनल ऑफिशियल कामे सहजरीत्या आणि सिक्युअरली करता येतात. यासोबतच पेमेंट करण्याची सुविधा देखील व्हाट्सअप देते. काही दिवसांपूर्वी whatsapp ने नुकतच चैनल फीचर लॉन्च केले. त्यानंतर आता whatsapp  बिझनेस युजर साठी नवीन फीचर लॉन्च करणार आहे. जेणेकरून बिजनेस करणाऱ्या व्यक्तींना व्हाट्सअप च्या माध्यमातून फायदा होईल.

   

काय आहे हे फीचर

WABETAINFO वेबसाईट वरून मिळालेल्या माहितीनुसार, Whatsapp मध्ये मार्केटिंग मेसेज या नावाने नवीन फीचर लॉन्च करण्यात येणार आहे. या अपकमिंग फीचर च्या माध्यमातून मेसेज शेड्युल करण्याची सुविधा मिळेल. याशिवाय वेगळ्या पद्धतीने मेसेज सेंड करता येईल. ही सुविधा बिझनेस वाढवण्यासाठी, बिझनेसची आऊटरी स्ट्रॅटर्जी डेव्हलप करण्यासाठी मदत करेल. या फीचरच्या माध्यमातून बऱ्याच कंपन्या मेसेजेस हा वेगळ्या पद्धतीने विश्लेषण करू शकतात. आणि ग्राहकांसोबत कॉन्टॅक्ट वाढवण्यासाठी इंट्रॅक्शन देखील वाढवू शकतात.

या मार्केटिंग मेसेज फीचर्स साठी भरावे लागतील पैसे

Whatsapp वर लवकरच लॉन्च करण्यात येणारे अपकमिंग मार्केटिंग मेसेज फिचर यासाठी युजर्स ला पैसे पेड करावे लागतील. सध्या तरी छोटा बिझनेस करणाऱ्या ग्राहकांच्या इच्छा पाहता या फिचरची सुरुवातीला फीस कमी ठेवेल. जेणेकरून व्यवसाय वाढवण्यासाठी मदत होईल. आणि यूजर्स मोठ्या संख्येने whatsapp च्या या नवीन फीचर्स चा लाभ घेऊ शकतीलआणि प्रमोशन करू शकतील.

या फीचर मध्ये मिळणार हे खास ऑप्शन

अपकमिंग मार्केटिंग मेसेज फिचर हे नवीन ऑफर, घोषणा, कुपन आणि विक्री  यासारख्या जाहिरातींचा प्रसार करण्यासाठी खास ऑप्शन आहे. या फिचरच्या माध्यमातून संपर्कात पारदर्शकता वाढवण्यासाठी ग्राहकांना त्वरित माहिती दिली जाईल. परंतु तुम्ही एखाद्या ग्राहकांना मेसेज पाठवत असाल तर ग्राहक तुमची तक्रार करू शकतात किंवा ब्लॉक करू शकतात. मार्केटिंग मेसेजच्या माध्यमातून बिझनेसमध्ये पूर्णपणे गुंतणे  स्वईच्छेने असेल.