Instagram वर येतंय नवीन फीचर्स; आता झटक्यात वाढणार तुमचे फॉलोअर्स

टाइम्स मराठी । Instagram हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जवळपास आपण सर्वच जण वापरत असेल. इंस्टाग्राम वर वेगवेगळे रिल्स, विडिओ आपण बघत असतो किंवा टाकत असतो. त्यामुळे जास्तीत जास्त फॉलोअर्स वाढवण्याकडे सर्वच भर असतो. यूजर्सचा अनुभव चांगला व्हावा यासाठी इंस्टाग्राम सुद्धा सातत्याने वेगवेगळे फीचर्स आणत असते. आताही इंस्टाग्राम एक नवं फीचर घेऊन येणार आहे ज्याच्यामुळे तुमचे फॉलोअर्स अतिशय फास्ट पद्धतीने वाढण्यास मदत होईल. आता हे फिचर नेमकं काय आहे? आणि ते कस वर्क करेल याबाबत आज आपण जाणून घेऊयात….

   

कंपनी लवकरच इंस्टाग्राममध्ये प्रोफाइल शेअर करण्याचा ऑप्शन देणार आहे. म्हणजेच तुम्ही तुमच्या इन्स्टा स्टोरीमध्ये कोणाचेही प्रोफाइल शेअर करू शकाल. आणि यूजर्स त्यावर क्लिक करून प्रोफाइलमध्ये थेट प्रवेश करू शकतील. यामुळे अगदी सहजपणे फॉलोअर्स वाढण्यास मदत होईल. सध्या चालू असलेल्या अँप मध्येही स्टोरी शेअर करायला येते पण तो क्यूआर कोडच्या स्वरूपात असल्याने यूजर्सला अडचणी येत आहेत. मात्र नव्या फीचर्स मुळे तुम्हाला कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी Instagram ने आपल्या यूजर्स साठी ‘Add Yours’ नावाचे टेम्पलेट दिले होते. या माध्यमातून यूजर्स आपल्या स्टोरी मध्ये आवडीचे टेम्प्लेट सेट करू शकत होते. तसेच तुमचे फॉलोअर्स सुद्धा यामध्ये भाग घेऊ शकतात आणि त्यांचे फोटो शेअर करू शकतात. इन्स्टाग्रामचे प्रमुख अॅडम मोसेरी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम ब्रॉडकास्ट चॅनलवर या अपडेटची माहिती सांगितली आहे.