Twitter वर येणार नवं फीचर्स; 91 मिलियन पेक्षा जास्त लोकांना पैसे कमवण्याची संधी

टाइम्स मराठी । मायक्रो ब्लॉगिंग म्हणून ओळख असलेला प्लॅटफॉर्म ट्विटरमध्ये सध्या बऱ्याच प्रकारे बदल करण्यात येत आहे. ट्विटरचे मालक एलन मस्क यांनी ट्विटर मध्ये बऱ्याच प्रकारचे बदल केले.  काही दिवसांपूर्वी ट्विटरचा लोगो बदलण्यात आला होता. त्यानंतर ट्विटर्स नाव आणि ब्लू टिक पेड करण्यात आली. त्यानंतर व्हिडिओ ब्रॉडकास्ट करण्याचे फीचर देखील कंपनीने युजर साठी उपलब्ध केले होते. आता एलन मस्क आणखीन एक फीचर युजर साठी उपलब्ध करणार आहे. या नवीन फीचर च्या माध्यमातून ट्विटरवर गेमिंग स्ट्रीम करण्याचे ऑप्शन देण्यात येईल.

   

काय असेल फीचर

Twitch याप्रमाणे व्हिडिओ गेम स्टीम करण्यासाठी एलन मस्क नवीन फीचर लॉन्च करणार आहे. सध्या या नवीन फीचर ची टेस्टिंग सुरू असून   याबाबत एलन मस्क यांनी  ट्विटर वर पोस्ट करत  याबाबत माहिती शेअर केली आहे. या फीचर्सच्या माध्यमातून सध्या लाईव्ह स्ट्रीम करता येईल आणि त्याची स्पीड वाढवता येईल. या फीचर मध्ये व्हिडिओ कॉलिटी अपग्रेड करण्याचे ऑप्शन देण्यात येणार नाही.

जून महिन्यात एलन मस्क यांनी या अपकमिंग फीचर बद्दल माहिती दिली होती. एलेन मास यांनी फीचर बद्दल माहिती देण्याच्या एक दिवस पूर्वी  Twitch ने नवीन नियमावली जारी केली होती. Twitch ही एक अमेरिकी व्हिडिओ गेम स्ट्रीमिंग सर्विस आहे. नियमावली जारी केल्यानंतर गेम्स ने  Twitch वर स्ट्रीमिंग करणे बंद करून युट्युब फेसबुक वर स्ट्रीम करणे सुरू केले. आता ट्विटरवर  एलन मस्क आणणार असलेल्या नवीन गेम स्ट्रीमिंग फीचर मुळे  91 मिलियन पेक्षा जास्त लोकांना फायदा होऊ शकतो.

जून 2020 ते जून 2021 या काळात  ट्विटरवर 91 मिलियन गेमर्स उपलब्ध होते. हे गेमर्स गेमिंग संबंधित प्रति सेकंद 70 ट्विट करत होते. त्यानुसार हे नवीन फीचर लॉन्च झाल्यानंतर ट्विटरच्या यूजरबेसला मोठ्या प्रमाणात फायदा होईल. यासोबतच क्रियेटर्सला पैसे कमवण्याची संधी देखील मिळेल.