New Hero Glamour : Hero ने लाँच केली स्वस्तात मस्त Bike; पहा किंमत आणि फीचर्स

टाइम्स मराठी । हिरो मोटोकॉर्प (New Hero Glamour) ही भारतातील फेमस टू व्हीलर निर्माता कंपनी म्हणून ओळखली जाते. ग्राहकांना परवडेल अशा किमतीत आणि दमदार फीचर्सने सुसज्ज अशा गाड्या बाजारात आणण्याचा प्रयत्न कंपनी करत असते. त्याच पार्श्वभूमीवर हिरो मोटोकार्प कंपनीने Glamour 125 ही बाईक नवीन लूक मध्ये लॉन्च केली आहे. यामध्ये दोन व्हेरिएंट लॉन्च केले असून दोघांची किंमत वेगवेगळी आहे. हे दोन्ही व्हेरिएंट ड्रम आणि डिस्क मध्ये उपलब्ध आहेत. हिरो ग्लॅमरच्या ड्रम वेरियंटची किंमत 82,348 एवढी असून डिस्क वेरियंट ची किंमत 86,348 रुपये एवढी आहे. त्याचबरोबर कंपनीने ही बाईक नवीन तीन कलर्स मध्ये लॉन्च केली आहे. यात कॅंडी ब्लेझिंग रेड, टेक्नो ब्ल्यू ब्लॅक, स्पोर्ट रेड ब्लॅक हे ऑप्शन उपलब्ध आहेत.

   

New Glamour मायलेज

नवीन लॉन्च करण्यात आलेली हिरो ग्लॅमर मध्ये 125cc सिंगल सिलेंडर इंजन देण्यात आलेले असून हे इंजन एयर कुल्ड आहे. त्याचबरोबर हे इंजिन 7500 RPM वर 10.68 BHP पावर जनरेट करते आणि 6000 RPM वर 10.6 NM पीक टॉर्क जनरेट करते. हिरो कंपनीच्या या बाईक मध्ये i3S ऑइल स्टॉप स्टार्ट सिस्टीम देण्यात आली आहे. कंपनीने दावा केला आहे की New Hero Glamour तब्बल 63 किलोमीटर प्रति लिटर मायलेज देऊ शकते.

ग्राफिक्स आणि डिझाईन– (New Hero Glamour)

हिरो कंपनीची नवीन लॉन्च करण्यात आलेली ग्लॅमर बाईक आता चेकर्ड स्ट्राइप्ससह अपडेटेड ग्राफिक्स मध्ये उपलब्ध आहे. या बाईक मध्ये नवीन डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आले आहे. हे क्लस्टर रियल टाईम मायलेज इंडिकेटर आणि लो फ्युल इंडिकेटर यासारखी माहिती दर्शवते. त्याचबरोबर हिरो कंपनीने यामध्ये मोबाईल डिव्हाईस चार्ज करण्यासाठी एक यूएसबी चार्जर देखील जोडले आहे. त्याचबरोबर बाईकमध्ये 18 इंच चे अलॉय व्हील्स वापरण्यात आले आहे.

स्पेशालिटी

या बाईक मध्ये (New Hero Glamour) ड्रायव्हर सीट 8mm छोटा आणि पिलन सीट 17 mm खाली करण्यात आले आहे. जेणेकरून छोटी हाईट असलेले लोक देखील ही बाईक आरामात चालवू शकतील. त्याचबरोबर या बाईकमध्ये फ्युल टॅंक थोड्या प्रमाणात फ्लॅट करण्यात आला आहे. यासोबतच जास्त मायलेज मिळण्यासाठी आयडियल स्टार्ट स्टॉप सिस्टीम देखील यात देण्यात आली आहे. त्यामुळे ट्रॅफिक मध्ये जास्त फ्युल एफिशिएंसी मिळते.