नवीन Creta Facelift 16 जानेवारीला लॉन्च होण्याची शक्यता

टाइम्स मराठी । Hyundai कंपनीच्या भारतीय बाजारपेठेत बऱ्याच SUV उपलब्ध आहेत. आता कंपनी लवकरच मार्केटमध्ये नवीन SUV लॉन्च करणार आहे. या नवीन SUV च नाव Hyundai Creta Facelift असेल. तुम्ही जर नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या नवीन अपकमिंग ह्युंदाई क्रेटा लॉन्चिंगचा वेट करू शकता. या Hyundai क्रेटामध्ये बरेच अप्रतिम फीचर्स देण्यात येणार आहे. Hyundai Motor India ही SUV 16 जानेवारी 2024 ला अपकमिंग इव्हेंट मध्ये लॉन्च करण्याची शक्यता आहे. कंपनी या मॉडेलची किंमत सध्या उपलब्ध असलेल्या मॉडेल पेक्षा जास्त ठेवू शकते. जाणून घेऊया अपकमिंग SUV चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन.

   

सेफ्टी फिचर्स

New Hyundai Creta Facelift हे नवीन मॉडेल भारतामध्ये बऱ्याचदा टेस्टिंग करताना दिसून आले. त्यानुसार या मॉडेलचे बरेच फोटोज आणि व्हिडिओज लिक झाले असून या मॉडेल बद्दल बरीच माहिती मिळाली आहे. या अपकमिंग मॉडेलमध्ये एक्स्टेरियल आणि इंटरनल दोन्ही बदल करण्यात येतील. या ह्युंदाई क्रेटा मॉडेलमध्ये ॲडव्हान्स ड्रायव्हर असिस्टंट सिस्टीम ADAS सोबतच बरेच सेफ्टी फीचर्स मिळतील. या कार मध्ये ऍडॉप्टीव्ह क्रूज कंट्रोल, ब्लाइंड मॉनिटरिंग सिस्टीम, इमर्जन्सी ब्रेकिंग सिस्टीम, हाय बीम असिस्ट, कॉलिजन अवॉइडन्स आणि लेन कीप असिस्ट यासारखे फीचर्स मिळतील.

फिचर्स

Hyundai Creta Facelift मध्ये 10.25 इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मिळेल. यासोबतच बोस साऊंड सिस्टिम, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, वायरलेस फोन चार्जिंग, पॅनोरमिक सनरूफ, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, USB टाईप C चार्जर, 6 एअरबॅग, पार्किंग सेंसर, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम  देण्यात येईल. यासोबतच या कारची डिझाईन देखील अपडेट करण्यात येणार आहे. ज्यामध्ये फ्रंट ग्रील, बंपर, हेडलॅम्प, LED DRLS यामध्ये देखील बदल दिसून येतील. याशिवाय कार मध्ये नवीन डिझाईन अलॉय व्हील्स आणि नवीन टेललॅम्प दिसतील.

इंजिन

या SUV मध्ये तीन इंजिन ऑप्शन उपलब्ध करण्यात येऊ शकतात. त्यापैकी 1.5 लिटर नॅचरली अस्पिरेटेड इंजिन असेल.  हे इंजिन 115 BHP पावर जनरेट करेल. दुसरे 1.5  लिटर डिझेल इंजिन असेल. हे इंजिन 115 BHP पॉवर जनरेट करेल. आणि तिसरे 1.5 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन ऑप्शन मिळेल. हे इंजिन 160 BHP पावर जनरेट करेल.