New Kia Sonet Facelift 2024 भारतात लाँच ; 20 डिसेंबर पासून बुकिंग सुरु

New Kia Sonet Facelift 2024 । दक्षिण कोरियाई कार निर्माता कंपनी म्हणून ओळखली जाणाऱ्या Kia कंपनीने भारतीय बाजारपेठेत नवीन 5 सीटर कार सादर केली आहे. कंपनीने 2020 मध्ये किआ सोनेट लॉन्च केली होती. त्यानंतर आता कंपनीने KIA SONET चे पहिले अपडेटेड व्हर्जन उपलब्ध केले आहे. ही 5 सीटर कार 20 डिसेंबर पासून बुकिंग साठी उपलब्ध करण्यात येणार आहे. तुम्ही देखील ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर  जवळच्या डीलरशिप वर जाऊन ऑनलाईन बुकिंग करू शकतात. जाणून घेऊया या कारमध्ये उपलब्ध असलेले फीचर्स आणि स्पेसिफिकेशन.

   

कलर आणि व्हेरीएंट

New Kia Sonet Facelift 2024 ही 11 कलर ऑप्शन आणि 7 वेरियंट मध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यानुसार मोनोटोन शेड्स मध्ये ग्लेशियर व्हाईट पर्ल, स्पार्कलिंग सिल्वर, ग्रॅव्हिटी ग्रे, ऑरोरा ब्लॅक पर्ल, इंटेंस रेड, इंपीरियल ब्लू, क्लियर व्हाइट, प्यूटर ऑलिव आणि मैट ग्रेफाइट शेड मिळतील. यासोबतच डुअल-टोन कलर मध्ये ही कार ब्लॅक रूफ, इंटेंस रेड आणि ग्लेशियर व्हाइट पर्ल कलर मध्ये उपलब्ध होईल. आणि वेरीएंट बद्दल बोलायचं झालं तर, HTE, HTK, HTK+, HTX, HTX+, GTX+ आणि X-Line या व्हेरीएंट मध्ये ही कार सादर करण्यात आली आहे.

फीचर्सNew Kia Sonet Facelift 2024

New Kia Sonet Facelift 2024 या अपकमिंग कार बद्दल बोलायचं झालं तर यामध्ये LED DRL उलट्या साईडने L-आकारात देण्यात आले आहे. या सोबतच एक मॉडीफाइड फ्रंट फेसिया, नविन डिजाइन असलेले LED हेडलैंप,नविन LED फॉगलैंप आणि मागच्या साईडने एक लाइट बार यासारखे फीचर्स मिळतील. या अपकमिंग कार च्या इंटिरियर बद्दल बोलायचं झालं तर, कारच्या केबिनमध्ये नविन डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, 10.25-इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट स्क्रीन, लेवल 1 ADAS सूट, नवीन एयरकॉन पैनल, वॉइस कंट्रोल्ड विंडो फंक्शन आणि वेंटीलेटेड सीट देण्यात आले आहे.

इंजिन

New Kia Sonet Facelift 2024 मध्ये जुन्या मॉडेल प्रमाणेच पॉवरट्रेन देण्यात आली आहे. या कार मध्ये तीन पावर ट्रेन ऑप्शन मिळतात. त्यानूसार पाहिले 1.2 लिटर पेट्रोल इंजिन 82 bhp की पॉवर आणि 115 Nm पिक टॉर्क जनरेट करते. यासोबतच 1.5-लीटर डीजल इंजन देखील यामध्ये उपलब्ध आहे. हे डिझेल इंजिन 114 bhp पॉवर आणि 250Nm पिक टॉर्क जेनरेट करते.  तिसरा इंजिन ऑप्शन म्हणजेच 1.0-लीटर टर्बो-पेट्रोल इंजन. हे इंजिन 118bhp पॉवर आणि 172Nm पिक टॉर्क जनरेट करते. या इंजिन सोबत 5-स्पीड मैनुअल, 6-स्पीड मैनुअल, 6-स्पीड IMT, 6-स्पीड ऑटोमेटिक और 7-स्पीड DCT गियरबॉक्स ऑप्शन मिळेल.

सेफ्टी फिचर्स

या कार मध्ये कंपनीकडून अप्रतिम सेफ्टी फीचर देण्यात आले आहे. ज्यामुळे ही नवीन कार पहिल्यापेक्षा सुरक्षित बनते. यामध्ये ADAS लेवल-1 देण्यात आले आहे. यासोबतच  ADAS पैक, फॉरवर्ड कोलाइजन वार्निंग, लेन डिपार्चर वार्निंग, कोलाइजन एवॉइडेंस असिस्टेंस, हाई-बीम असिस्ट, लेन कीप असिस्ट यासारखे सेफ्टी फीचर्स मिळतात. एवढेच नाही तर, 6 एयरबैग, हिल-स्टार्ट असिस्ट, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS), इलेक्ट्रॉनिक स्टैबिलिटी कंट्रोल (ESC) हे ऍडव्हान्स फीचर देखील या कारमध्ये देण्यात आले आहे.