New Mercedes-Benz GLE LWB भारतात लाँच; पहा किंमत आणि फीचर्स

टाइम्स मराठी । नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला Mercedes-Benz India कंपनीने नवीन कार लॉन्च केली आहे. New Mercedes-Benz GLE LWB असे या गाडीचे नाव असून कंपनीने ही कार तीन व्हेरिएंट मध्ये लॉन्च केली आहे. या SUV कारची किंमत 96.40 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनीने ही कार एकूण ३ व्हेरियेण्ट मध्ये लाँच केली आहे. यामध्ये GLE 300 D 4MATIC, GLE 450 4MATIC, GLE 450D 4MATIC चा समावेश आहे. या तिन्हीही व्हेरिएंट च्या किमती वेगवेगळ्या आहेत. आज आपण या कारचे खास फीचर्स जाणून घेणार आहोत.

   

डिझाईन

New Mercedes-Benz GLE LWB या SUV च्या डिझाईन बद्दल बोलायचं झालं तर, यामध्ये सिलिक LED हेडलॅम्प, सिंगल स्लॅट ग्रील, न्यू डिझाईन अलोय व्हील, अपडेटेड LED टेल लाईट, न्यू रियर बंपर हे फीचर्स देण्यात आले आहेत. याशिवाय या SUV मध्ये साईड स्टेप आणि ब्लॅक आउट ORVM देखील उपलब्ध आहे. GLE 300 D 4MATIC या एसयूव्ही बद्दल बोलायचं झालं तर, कंपनीने  ही SUV प्रोफेशनल लाईन ड्रीम मध्ये उपलब्ध केली आहे. GLE 450 4MATIC आणि GLE 450D 4MATIC या दोन्ही व्हेरिएंटला कंपनीने AMG लाईन ट्रिम मध्ये उपलब्ध केले आहे. NEW MERCEDES GLE यासोबत तिन्हीही व्हेरिएंटला कंपनीने 48 W माइल्ड हायब्रीड टेक्नॉलॉजीने सुसज्ज केले आहे.

फिचर्स

New Mercedes-Benz GLE LWB या एसयूव्हीमध्ये  नवीन स्टीअरिंग व्हील देण्यात आले आहे. याशिवाय इन्फोटेनमेंट  सेटअप मध्ये 13 स्पीकर, 590 W, बर्मेस्टर साऊंड सिस्टीम उपलब्ध आहे. त्याचबरोबर कार मध्ये चार जोन क्लायमेट कंट्रोल, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि एप्पल कार प्ले कनेक्टिव्हिटी, वायरलेस फोन चार्जर, पॅनोरामिक सनरुफ, इलेक्ट्रिक टेलगेट हे फीचर्स देखील उपलब्ध आहेत. या कारमध्ये उपलब्ध असलेल्या सेफ्टी फीचर्स बद्दल बोलायचं झालं तर, यामध्ये 9 एअर बॅग, EBD सह ABS सिस्टीम, ट्रॅक्टर आणि स्टॅबिलिटी कंट्रोल, ADAS यासारखे फीचर्स उपलब्ध आहेत.

स्पेसिफिकेशन

MERCEDES GLE 300D 4MATIC या व्हेरिएंटमध्ये एक टर्बोचार्ज्ड,  2.0 लिटर चार सिलेंडर डिझेल इंजिन मिळते. हे इंजिन 265.5 BHP  पावर आणि 550 NM पीक टॉर्क जनरेट करते. ही SUV 6.9 सेकंदामध्ये 0 ते 100 किलोमीटर प्रति तास एवढी रेंज पकडते. आणि प्रति तास 230 किलोमीटर इतकं टॉप स्पीड देते. GLE 450 4MATIC मध्ये टर्बो चार्ज्ड 3.0 लिटर डिझेल इंजिन मिळते. हे इंजिन 366 BHP पावर आणि 750 NM पीक टॉर्क जनरेट करते. ही कार 5.6 सेकंदात 0 ते 100 किलोमीटर प्रति तास इतका वेग वाढवण्यास सक्षम असून 250 किलोमीटर प्रति तास टॉप स्पीड देते.

GLE 450D 4MATIC पावर ट्रेन

GLE 450D 4MATIC या एसयूव्ही मध्ये 3.0 पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 381 BHP पावर आणि 500 nm पीक टॉर्क जनरेट करते. या कारचा टॉप स्पीड बद्दल बोलायचं झालं तर प्रति घंटा 250 किलोमीटर एवढी स्पीड देते. या कारमध्ये देण्यात आलेले सर्व इंजिन 9 स्पीड गिअर बॉक्स सह सुसज्ज आहेत.

किंमत

NEW MERCEDES GLE या SUV ची किंमत  96.40 लाख रुपये आहे. कंपनीने लॉन्च केलेला तिन्ही व्हेरियंटची किंमत वेगवेगळी असून GLE 300 D 4MATIC या SUV ची किंमत 96.4 लाख रुपये आहे. GLE 450 4MATIC या SUV ची किंमत 1.1  करोड रुपये आहे. त्याचबरोबर GLE 450D 4MATIC या मॉडेलची किंमत कंपनीने 1.15 करोड रुपये ठेवली आहे.