WhatsApp Status ला रिप्लाय देण्यासाठी मिळणार नवा ऑप्शन; कंपनी लाँच करणार नवं फीचर्स

टाइम्स मराठी । WhatsApp या इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मच्या मदतीने आजकाल पर्सनल ऑफिशियल सर्व प्रकारची कामे केली जातात. यासोबतच  मेटा कंपनीने WhatsApp मध्ये वेगवेगळे फीचर्स उपलब्ध केल्यामुळे सर्व प्रकारची कामे करणे आता  सोपे झाले आहे. मेटा कंपनी WhatsApp मध्ये आणखीन फीचर्स उपलब्ध करणार असून हे फीचर्स WhatsApp Status संदर्भात असेल. सध्या कंपनीकडून या फिचर वर काम सुरू असून हे फीचर अप्रतिम असेल. चला तर याबाबत अधिक जाणून घेऊयात….

   

काय आहे हे फीचर

जेव्हा आपण WhatsApp मध्ये Status पाहत असतो त्यावेळी आपल्याला स्टेटसला रिप्लाय देण्यासाठी रिप्लाय टॅब वर क्लिक करून रिप्लाय द्यावा लागतो.  परंतु आता स्टेटस वर रिप्लाय देण्यासाठी  रिप्लाय टॅब वर क्लिक करण्याची गरज भासणार नाही. कारण व्हाट्सअप  रिप्लाय बार वर काम करत आहे. म्हणजेच आता रिप्लाय देण्यासाठी क्लिक न करता नवीन ऑप्शन उपलब्ध होईल. व्हाट्सअप मध्ये उपलब्ध करण्यात येणार असलेल्या या अपकमिंग फीचर  बद्दल WABETAINFO या वेबसाईटने माहिती दिली आहे.

इंस्टाग्राम प्रमाणे करेल काम

व्हाट्सअप उपलब्ध करणार असलेले हे अपकमिंग फीचर अँड्रॉइड आणि  IOS बीटा टेस्टर साठी उपलब्ध करण्यात आले आहे. या नवीन फीचरमुळे  स्टेटस पाहताना युजर्स ला चांगला अनुभव मिळेल. आणि स्टेटस वर रिप्लाय करणे देखील सोपे होईल. व्हाट्सअप मध्ये उपलब्ध करण्यात येणार असलेले हे फीचर इंस्टाग्राम प्रमाणेच काम करेल. जेव्हा तुम्ही इंस्टाग्राम वर स्टोरी पाहतात  तेव्हा तुम्हाला डिफॉल्टनुसार रिप्लायचा ऑप्शन मिळतो. त्याच प्रकारे व्हाट्सअप मध्ये देखील असेल.