1 डिसेंबर पासून सिम कार्ड खरेदी- विक्री करणाऱ्यांसाठी नवीन नियम

टाइम्स मराठी । नोव्हेंबर महिना संपण्यासाठी आठवडा बाकी असून आता 1 डिसेंबर पासून सिम कार्ड विक्री आणि खरेदी बाबत नवीन नियम लागू करण्यात येणार आहे. दूरसंचार विभाग DOT ने सिम कार्ड खरेदी आणि विक्रीसाठी नवीन नियम जारी केले आहे. यासोबतच कंपनीने सिम कार्ड खरेदी आणि विक्रीच्या काही नियमांमध्ये बदल देखील केले आहेत. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींना जेल जावे लागू शकते. आज काल मोठ्या प्रमाणात सायबर क्राईम वाढत असून या गुन्ह्यांची वाढ रोखण्यासाठी सरकारने नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेतला. जेणेकरून सिम कार्ड च्या माध्यमातून होणारे फ्रॉड थांबवता येतील.

   

सरकारकडून एक डिसेंबर पासून लागू करण्यात येणारे सिम कार्ड संदर्भात नियम 1 ऑक्टोबर 2023 पासून लागू करण्यात येणार होते.  परंतु त्यानंतर दोन महिन्यांचा वेळ देत आता 1 डिसेंबर पासून हे नियम लागू होतील. भारतात सध्या तरी दहा लाख सिमकार्ड विक्रेते आहेत. हे सिम कार्ड विक्रेते  स्वतः फ्रॉड करणाऱ्या व्यक्तींना सिम कार्ड पूरवत असल्याचे उघड झाले आहे. यासोबतच काही व्यक्तींच्या नावावर दोन पेक्षा जास्त सिम कार्ड असल्याचे देखील काही दिवसांपूर्वी उघड झाले होते. त्यामुळे सरकारने आता सिम कार्ड खरेदी आणि विक्री दोन्हींसाठी नियम लागू केले आहे.

1 डिसेंबर पासून सिम खरेदीसाठी हे नियम होतील लागू

1) 1 डिसेंबर पासून लागू करण्यात येणाऱ्या नियमानुसार, सिम कार्ड खरेदी  करणाऱ्या व्यक्तीला ओळख आणि पत्त्याचा पुरावा द्यावा लागेल. यामध्ये त्यांना आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटर आयडी कार्ड, पासपोर्ट यासारखे कागदपत्रे  सिम कार्ड खरेदीसाठी लागतील.

2) नवीन नियमानुसार सिम कार्ड खरेदी करणारे व्यक्ती एका आयडीवर जास्त सिम कार्ड खरेदी करू शकत नाही. एका लिमिट पर्यंतच खरेदीदाराला सिम कार्ड मिळेल.

3) पॉईंट ऑफ सेल POS म्हणजेच सिम विक्री करणाऱ्या व्यक्तींना 30 नोव्हेंबर पर्यंत विक्रेता म्हणून नोंदणी करणे देखील गरजेचे आहे.