New Toyota Hilux Hybrid लॉन्च; मिळतात हे खास फीचर्स

टाइम्स मराठी । जपानी वाहन निर्माता कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या Toyota कंपनी भारतीय बाजारपेठेमध्ये वेगवेगळ्या सेगमेंट मध्ये वाहून लॉन्च करत असते. आता टोयोटा कंपनीने युरोपीय मार्केटमध्ये टोयोटाच्या हिलक्स लाइफस्टाईल पिकअप ट्रकचे माइल्ड हायब्रीड व्हर्जन लॉन्च केले आहे. कंपनी हे वर्जन 2024 मध्ये ग्लोबल मार्केटमध्ये लॉन्च करणार आहे. या वर्जनमध्ये पूर्णपणे अपडेटेड इंटेरियर डिझाईन, नवीन प्लॅटफॉर्म आणि इंजिन ऑप्शन, यासारखे बरेच फीचर्स आणि अपडेट्स मिळणार आहे. टोयोटा कंपनीचे हे न्यू जनरेशन मॉडेल असेल. आज आपण जाणून घेऊया या मॉडेलचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन.

   

पावरट्रेन 

New Toyota Hilux Hybrid या वेरियंटमध्ये कंपनीने 2.8 लिटर टर्बो डिझेल इंजिन दिले आहे. हे इंजिन 48 वोल्ट माइल्ड हायब्रीड सेटअप सहस सुसज्ज आहे. या सेटअप मुळे यामध्ये रेगुलर मॉडेलच्या तुलनेत 10% जास्त मायलेज मिळते. या इंजिनला कंपनीने सहा स्पीड ऑटोमॅटिक गिअर बॉक्स ने जोडले आहे. यामध्ये इलेक्ट्रिक मोटर देखील देण्यात आली असून ही मोटर जास्त टॉर्क जनरेट करते.

डिझाईन

New Toyota Hilux Hybrid हे न्यू जनरेशन मॉडेल TNGA -F आर्किटेक्चर वर डिझाईन करण्यात आले आहे. हे प्लॅटफॉर्म लँड क्रूजर 300, लेक्सक्स LX500d, टायकोमा पिकअप यासारख्या बऱ्याच ग्लोबल मॉडेल्स साठी देखील वापरण्यात येते. हे फ्लेक्झिबल आर्किटेक्चर बऱ्याच बॉडी स्टाईल आणि आयसीई, हायब्रीड सोबतच बऱ्याच इंजिन ऑप्शन ला सपोर्ट करते.

फिचर्स

New Toyota Hilux Hybrid मध्ये रिझनेटिव्ह ब्रेकिंग सिस्टीम वापरण्यात आली आहे. एवढेच नाही तर 700 mm खोल पाण्यामध्ये उतरण्याची क्षमता या मॉडेलमध्ये आहे. यामध्ये अप्रतिम ऑफ रोड क्रेडेन्शियन्स साठी एक अग्रेसिव्ह फ्रंट बंपर डिझाईन मिळते. यासोबतच एक मोठे फेंडर फ्लेयर्स, स्ट्रॉंग कर्व्ह, क्रीज सह फ्लॅट बोनट, व्हाईट बॉडी वर्क, एक ब्लॅक आउट रुफ, फ्लेयर्ड व्हिल आर्च, स्किड प्लेट्सच्या चारही साईडने क्लेडींग देण्यात आली आहे.