Car बनवणाऱ्या कंपनीने लाँच केला Mobile; 16 GB रॅम, 50 MP कॅमेरा अन् बरंच काही

टाइम्स मराठी । चिनी इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी Nio ने नवीन मोबाईल लॉन्च केला आहे. हा फोन चीनच्या वेबसाईट वर लिस्ट करण्यात आले. हा स्मार्टफोन इलेक्ट्रिक कार सह युज करण्यासाठी डिझाईन करण्यात आला आहे. हा Nio Phone गाडीवर कंट्रोल ठेऊ शकतो. आज आपण या मोबाईलचे खास फीचर्स आणि किमतीबाबत जाणून घेणार आहोत.

   

6.81 इंच डिस्प्ले –

Nio Phone मध्ये 6.81 इंचाचा LTPO OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 2K रिझोल्युशन आणि 120 HZ रिफ्रेश रेट सह येतोय. त्याचबरोबर हा स्मार्टफोन 1800 निट्स पिक ब्राईटनेससह येत असून HDR 10+ सपोर्टसह उपलब्ध आहे. कंपनीने या फोनमध्ये ऑक्टाकोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 प्रोसेसर दिलाय .

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Nio Phone मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्यानुसार 50 मेगापिक्सेलचा sony IMX707 प्रायमरी कॅमेरा, 50 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड कॅमेरा आणि 50 मेगापिक्सलचा टेलीफोटो कॅमेरा देण्यात आला आहे. या Nio Phoneमध्ये 5200 mAh बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 50 W आणि 66W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीने या मोबाईल मध्ये 16 GB रॅम आणि एक TB इंटरनल स्टोरेज दिले आहे.

मोबाईल करेल कारला कंट्रोल –

Nio Phone मध्ये कार कंट्रोल करण्यासाठी 30 पेक्षा जास्त फीचर्स उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यानुसार तुम्ही हा फोन रिमोट कंट्रोल नुसार देखील वापरू शकतात. या फोनच्या माध्यमातून तुम्ही कार लॉक किंवा अनलॉक करू शकतात. यासोबतच सीट अड्जस्ट, पार्क होण्याची कमांड देखील या कारला देऊ शकतात. याशिवाय यामध्ये फ्लॅगशिप फीचर्स देखील उपलब्ध आहे.

किंमत किती?

Nio Phone या फोनची किंमत ३ व्हेरिएंट नुसार ठरवण्यात आली आहे. त्यापैकी 12 GB रॅम + 512 GB इंटरनल स्टोरेज असलेल्या फोनची किंमत CNY 6499 म्हणजेच भारतीय चलनानुसार 73,800 रुपये एवढी आहे. 12 GB रॅम + 1 TB वर यांची किंमत CNY 6899 आहे. म्हणजेच 78,350 रुपये आणि 16 GB रॅम + 1 TB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत CNY 7499 म्हणजेच 85,200 रुपये एवढी आहे.