Nissan Hyper Tourer : Nissan ने लाँच केली Hyper Tourer कार; लूक पाहूनच वेड लागेल

टाइम्स मराठी । ऑटोमोबाईल कंपन्या बाजारात टिकून राहण्यासाठी वेगवेगळ्या सेगमेंट मध्ये कार मॉडेल्स विकत आहे. त्यामध्ये हॅचबॅक किंवा SUV या कारची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे अनेक सेगमेंट मध्ये आपल्या कार प्रदर्शित करणे गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर आता जपानी कार निर्माता कंपनी म्हणजे Nissan ने भारतीय बाजारपेठेमध्ये नवीन हाईपर टूरर कार (Nissan Hyper Tourer)लॉन्च केली आहे. ही Nissan मोटर्स कंपनीची ऍडव्हान्स इलेक्ट्रिक कार असून इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये हे निसान कंपनीचे तिसरे मॉडेल आहे. 25 ऑक्टोबरला जपान मध्ये होणाऱ्या मोबिलिटी शोमध्ये ही कार प्रदर्शित करण्यात येणार आहे. ही ऑल इलेक्ट्रिक मिनीव्हॅन आहे. ही कार अशा व्यक्तींसाठी डेव्हलप करण्यात आली आहे, जे व्यक्ती छोट्या मोठ्या गोष्टी शोधत असतात. आणि मित्रांसोबत ट्रॅव्हलिंगचा आनंद घेत असतात.

   

Nissan Hyper Tourer ही ऑटोमेटेड ड्रायव्हिंग सह वेगवेगळ्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी सह सुसज्ज आहे. त्याचबरोबर ही कार ओमोटेनाशी म्हणजेच जापानी हॉस्पिटॅलिटीसह सुसज्ज आहे. त्याचबरोबर यामध्ये हाय कॅपॅबिलिटी असलेली बॅटरी देण्यात आहे. त्यामुळे ही कार वेगवेगळ्या व्यवसायांसाठी, घर, दुकान, ऑफिससाठी वीज पुरवण्यास सक्षम आहे.

लूक आणि डिझाईन – Nissan Hyper Tourer

Nissan Hyper Tourer या कारचा बाहेरील भाग हा स्मूथ बॉडी पॅनल आणि शार्प कॅरेक्टर लाईनने डेव्हलप करण्यात आला आहे. या कारचा हाय एरोडायनॅमिक परफॉर्मन्स आणि ऑटोमॅटिक ड्राईव्ह च्या कॉम्बिनेशन सह या कारचे साईडवाल्स समोरून मागच्या फेंडरपर्यंत डायग्नोली चालतात. त्याचबरोबर या कारमध्ये देण्यात आलेले व्हाईट वेस्ट हेडलाईट हे सिग्नेचर लॅम्प प्रमाणे काम करतात. या कारमध्ये कुमिको पॅटर्न वाले टायर्स वापरण्यात आले आहे. यामुळे कारला क्लासी लूक दिसतोय.

Nissan Hyper Tourer या कारमध्ये उपलब्ध असलेल्या इंटेरियर बद्दल बोलायचं झालं तर यामध्ये पॅकेजिंग डेव्हलप करण्यासाठी कॉम्पॅक्ट घटक आणि हाय एनर्जी डेन्सिटी ऑल सॉलिड स्टेट बॅटरी इंटीग्रेट करण्यात आली आहे. यामध्ये ऍडव्हान्स E4ORCE ऑल व्हील कंट्रोल सिस्टीम देण्यात आली आहे. या सिस्टीम मुळे स्मूथ आणि फ्लॅट एक्सीलेरेशन आणि रिटायर्डेशन जनरेट होतो. यामध्ये वापरण्यात आलेले ओवर हेड कन्सोल आणि लाइटिंग हे जपानच्या तुम्ही को आणि कुमिको पॅटर्न पैकी एक आहे. या पॅटर्नमुळे गाडीला लक्झरी लूक प्राप्त होतो.

या कारच्या फ्लोरमध्ये फ्लॅट LED पॅनल लावण्यात आले आहे. या कारच्या ऑटोमॅटिक ड्रायव्हिंग सीट बसलेल्या ड्रायव्हरला पॅसेंजर सोबत गप्पा मारण्यासाठी काहीच प्रॉब्लेम येत नाही. या गोष्टीचा विचार करूनच ही कार डेव्हलप करण्यात आली आहे. त्याचबरोबर या कारच्या समोरील सीट 360 डिग्री मध्ये फिरतात. आणि मागच्या साईडने असलेले फ्रंट सीट हे डिस्प्ले वर उपलब्ध असलेले नेवीगेशन आणि ऑडिओ कंट्रोल करू शकतात. म्हणजेच फ्रंट सीट डिस्प्ले पर्यंत जाऊ शकते.