Nissan ची ‘ही’ SUV Car परडवणाऱ्या किमतीत उपलब्ध; 11 हजाराच्या डाऊनपेमेंट मध्ये करा खरेदी

टाइम्स मराठी । सध्या कार कंपन्या बाजारात टिकून राहण्यासाठी वेगवेगळ्या सेगमेंट मध्ये कार मॉडेल्स विकत असतात. काही दिवसांपूर्वी जपानी कार निर्माता कंपनी Nissan ने भारतीय बाजारपेठेमध्ये Magnite EZ-Shift चे AMT SUV एडिशन लॉन्च केले आहे. ही AMT एसयूव्ही परवडणाऱ्या किमतीमध्ये उपलब्ध करण्यात येणार असल्याचं कंपनीने सांगितलं आहे. त्यानुसार या SUV ची किंमत भारतामध्ये 6 लाख 50 हजार रुपये एवढी आहे. त्याचबरोबर 11 हजार रुपयांचा डाऊन पेमेंट वर देखील ही SUV बुक करता येणार आहे.

   

स्पेसिफिकेशन

Nissan Magnite EZ-Shift या एसयूव्हीमध्ये 1.0 लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 71 bhp पावर आणि 96 nm पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिन सोबत नवीन AMT ट्रान्समिशन 5 स्पीड युनिट उपलब्ध करण्यात आले आहे. त्याचबरोबर कंपनीने पाच स्पीड मॅन्युअल गिअर बॉक्स साठी फ्युल कॅपॅसिटी 19.35 किलोमीटर प्रति लिटर एवढी असण्याची शक्यता वर्तवली आहे.

फिचर्स

निसान मॅग्नाइट इजेड शिफ्ट या SUV मध्ये ड्युअल ड्रायव्हिंग मोड उपलब्ध आहे. त्यानुसार ड्रायव्हरला गिअर बॉक्स मॅन्युअल कंट्रोल करता येऊ शकते. निसान मोटर्स या कंपनीने एक क्रिप फंक्शन देखील या कारमध्ये उपलब्ध केले आहे. या फंक्शनच्या माध्यमातून ब्रेक सोडल्यानंतर कार पुढे जाण्यासाठी अनुमती देते. त्याचबरोबर यामध्ये अँटी स्टॉल आणि किक डाउन सुविधा देखील उपलब्ध करण्यात आली आहे. या एसयूव्हीमध्ये व्हीकल डायनामिक कंट्रोल VDC, हिल स्टार्ट असिस्ट HSA यासारखे फीचर्स देखील उपलब्ध आहेत.