Nissan Magnite Kuro Special Edition : Nissan ने लाँच केली नवी Car; किंमत 9 लाखांपेक्षा कमी

टाइम्स मराठी । सध्या कार कंपन्या बाजारात टिकून राहण्यासाठी वेगवेगळ्या सेगमेंट मध्ये कार मॉडेल्स बाजारात आणत आहेत. त्यामध्ये हॅचबॅक किंवा SUV देखील येतात. कारण मार्केटमध्ये टिकून राहणे फार महत्त्वाचे असते. त्याच पार्श्वभूमीवर आता जपानी कार निर्माता कंपनी Nissan ने भारतीय बाजारपेठेमध्ये  नवीन कार लॉन्च केली आहे. ही कार म्हणजे Nissan Magnite Kuro Special Edition आहे. या कारची किंमत ९ लाखांपेक्षा कमी असून ग्राहकांना नक्कीच परवडेल. आज आपण या गाडीचे खास फीचर्स जाणून घेऊया.

   

स्पेसिफिकेशन

Nissan Magnite Kuro Special Edition या कारमध्ये 1.0 लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन ५ स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही ट्रान्समिशन मध्ये उपलब्ध करण्यात आले असून 71 bHP पावर आणि 96 nm पीक टॉर्क जनरेट करते. ही स्पेशल एडिशन कार ब्लॅक कलर स्किन मध्ये उपलब्ध असून या कारमध्ये रेड ब्रेक कॅलिपर देण्यात आले आहे.

फिचर्स– Nissan Magnite Kuro Special Edition

Nissan Magnite Kuro Special Edition या कारमध्ये  डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, डायमंड कट अलॉय व्हील, एलईडी हेडलॅम्प, 360 डिग्री अराउंड व्ह्यू मॉनिटर कॅमेरा, रियल एसी वेंट यासह सेंटर कन्सोल आर्मरेस्ट, वायरलेस चार्जर, IRVM वाईडर यासारखे फीचर्स देण्यात आले आहे. या स्पेशल एडिशन कार मध्ये युनिक ब्लॅक इंटिरियर एक्सेंट आणि डोर ट्रिम इन्सर्ट करण्यात आले आहे.

किंमत किती?

Nissan Magnite Kuro Special Edition या कारमध्ये ऑल ब्रेक ग्रील, स्कीड प्लेट, रुफ रेल्स, अलॉय, ब्लॅक फिनिशर, हेडलॅम्प उपलब्ध आहे. ही कार kia Seltos आणि tata Nexon या कार सोबत प्रतिस्पर्धा करते. लवकरच Nissan मॅग्नाइट  EZ Shift लॉन्च करणार आहे.  निसान मॅग्नेट कंपनीची  ही मोठ्या साईज मध्ये उपलब्ध असलेली SUV आहे. या कारची बुकिंग सुरुवातीपासून सुरू करण्यात आली आहे. या SUV ची किंमत 8.27 लाख रुपये आहे. या SUV च्या टॉप वेरियंट KURO XV TURBO CVT ची किंमत 10.46 लाख रुपये आहे.