NISSAN Magnite : ‘हि’ कंपनी सध्या भारतात विकतेला फक्त 1 कार; BIG Discount मुळे थेट TATA ला टक्कर!

टाइम्स मराठी टीम (NISSAN Magnite) । सध्या प्रत्येक ठिकाणी स्पर्धा सुरू असल्याचं दिसतं. मग तो कॉलेज कॅम्पस असो किंवा एखादा व्यवसाय. कार कंपन्यांमध्ये देखील अशी स्पर्धा बघायला मिळते. या स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी सर्व कंपन्या वेगवेगळ्या कार लाँच करत असतात. पण भरतात अशी एक कंपनी आहे जी एकेकाळी ऑटो इंडस्ट्रीवर राज्य करत होती. परंतु सध्या फक्त एक कार मॉडेल विकत आहे. असे असले तरी ती थेट टाटाच्या कारला तगडी फाईट देत आहे.

   

जपानी कार निर्माता कंपनी निसान आपल्या दमदार अन लॅव्हिश कारसाठी ओळखली जाते. Nissan कंपनी भारतात सनी, मायक्रा, टेरानो आणि किक्स सारख्या लोकप्रिय कार विकत होती. पण जास्त विक्री न झाल्यामुळे या कार कंपनीला आपल्या कार बाजारातून कमी कराव्या लागल्या. परंतु आता कंपनीने आपले एकच मॉडेल भरतील बाजारात ठेवले आहे. टाटा पंच, रेनॉ किगर आणि ह्युंदाई व्हेन्यू सारख्या कारशी स्पर्धा करणाऱ्या निसान मॅग्नाइटचे एक मॉडेल विकले जात आहे. NISSAN Magnite हि कार तिच्या फीचर्स अन पॉव्हरमुळे लोकप्रिय तर आहेच परंतु या कारणे टाटाच्या गाड्यांना घाम फोडला आहे.

निसानच्या गाड्या कमी विकल्या गेल्यामुळे आणि काही अपग्रेड न झाल्यामुळे बंद पडल्या होत्या. मारुती, ह्युंदाई आणि होंडा यांच्यातील स्पर्धेमुळे निसानची कार जास्त विकल्या जात नव्हती. एवढंच नाही तर, कंपनीच्या लाइनअपमधील बहुतेक गाड्या रेनॉल्टच्या कारच्या रिबॅज केलेल्या प्रतिकृती होत्या, ज्यामुळे लोकांना या गाड्या अनेक बाबतीत चांगल्या असूनही आवडल्या नाहीत.

निसान कॅप्चर ही भारतात बंद होणारी कंपनीची शेवटची कार

निशाण कॅप्चार हि कर BS-VI फेज 2 मध्ये अपग्रेड न केल्यामुळे आणि कमी विक्री मुळे बंद करण्यात आली होती. यामुळं आता निसान कारच्याऐवजी कार मॉडेल विकत आहे. ते निसान मॅग्नाइट आहे. कंपनीच्या आधीच्या सर्व गाड्यांच्या तुलनेत या कारला चांगला प्रतिसाद मिळत असुन मॅग्नाइटची विक्री अलीकडच्या एका वर्षात मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

NISSAN Magnite भारतीय बाजारपेठेत 6 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे. तर, त्याच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 10.7 लाख रुपयांपर्यंत जाते. कंपनीकडून मे महिन्यात या कारवर 57,000 रुपयांची मोठी सूट देण्यात येत आहे. ही कंपनी दर महिन्याला या SUV च्या फक्त 3,000 युनिट्सची विक्री करू शकते. याचबरोबर टाटा नेक्सॉन आणि ह्युंदाई व्हेन्यूची विक्री तुलनेत खूप जास्त आहे.

या कंपनीने एका कार्यक्रमावेळी एक खुलासा केला आहे. निसान इंडिया पुढील वर्षी भारतात X-Trail, Qashqai आणि Juke सारख्या कार लॉन्च करण्याचा विचार करणार आहे. मारुतीच्या गाड्यांना टक्कर देण्यासाठी कंपनी हायब्रीड इंजिन आणि अपडेटेड फीचर्स असलेल्या नवीन कार लॉन्च करणार आहे.

NISSAN Magnite price in india – Rs. 5,99,000