6 लाख रुपयांच्या किमतीत उपलब्ध आहे ‘ही’ SUV Car; टाटा पंचला देते टक्कर

टाइम्स मराठी । सध्या कार कंपन्या बाजारात टिकून राहण्यासाठी वेगवेगळ्या सेगमेंट मध्ये कार मॉडेल्स लॉन्च करत आहे. यासोबतच भारतीय बाजारपेठेमध्ये पाच सीटर कारला मोठ्या प्रमाणात पसंती आहे. यासोबतच  तुम्ही देखील कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर 7 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीमध्ये उपलब्ध असलेल्या कार बद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या कारचं नाव आहे Nissan Magnite. निसान मॅग्नेट ही कार वेगवेगळ्या वेरियंटमध्ये उपलब्ध आहे. अप्रतिम मायलेज देणारी आणि परवडणाऱ्या किमतीमध्ये उपलब्ध असलेली ही कार आहे.

   

किंमत

Nissan Magnite या SUV कारची किंमत 6 लाख रुपये एवढी आहे. या कारचे टॉप मॉडेल 10.86 लाख रुपयांच्या किमतीमध्ये उपलब्ध आहे. कंपनीने या कारचे सात वेरिएंट लॉन्च केले आहे. यामध्ये  XE, XL, XV, turbo, Premium, premium Turbo (O), Geza Edition या व्हेरिएंट चा समावेश होतो. निसान ची ही बिग साईज कार असून परवडणाऱ्या किमतीमध्ये उपलब्ध आहे.

स्पेसिफिकेशन

Nissan Magnite या कारमध्ये 1.0 लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन पाच स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही ट्रान्समिशन मध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. हे इंजिन 100 PS पावर आणि 96 nm पीक टॉर्क जनरेट करते. या कारमध्ये टर्बो पेट्रोल इंजिनचे देखील ऑप्शन देण्यात आले आहे. ही कार 17.4 ते 19.34 किलोमीटर प्रति लिटर एवढे मायलेज देते.

फिचर्स

Nissan Magnite Kuro SPECIAL EDITION या कारमध्ये नऊ इंच एचडी टच स्क्रीन इम्पॉर्टंट सिस्टीम देण्यात आली आहे. यासोबतच सेफ्टी साठी यामध्ये  ADAS आणि एअर बॅग उपलब्ध करण्यात आले आहे. त्याचबरोबर यामध्ये DRL, 9 इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर,16 इंच अलॉय व्हील, LED हेडलॅम्प, 360 डिग्री अराउंड व्ह्यू मॉनिटर कॅमेरा, रियल एसी वेंट यासह सेंटर कन्सोल आर्मरेस्ट, वायरलेस चार्जर, IRVM वाईडर, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि एप्पल कार प्ले, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल यासारखे फीचर्स देण्यात आले आहे.