टाइम्स मराठी । सध्या कार कंपन्या बाजारात टिकून राहण्यासाठी वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये आपले मॉडेल्स विकत असतात. त्यामध्ये हॅचबॅक किंवा SUV हे देखील येतात. कारण मार्केट मध्ये टिकून राहणे फार महत्त्वाचे असते. त्यामुळं अनेक सेगमेंट मध्ये आपल्या कार लाँच करणे कंपन्यांसाठी गरजेचे बनलं आहे. परंतु भारतात अशी एक कंपनी आहे जी मार्केट मध्ये फक्त एकाच मॉडेलवर टिकून आहे. जी कंपनी सनी, मायक्रा, टेरानो आणि किक्स सारख्या लोकप्रिय कार विकत होती. जपानी कार निर्माता कंपनी म्हणजे निसान. ही भारतात सध्या फक्त एक मॉडेल विकत आहे. एक काळ असा होता की निसान भारतात हॅचबॅक, सेडान आणि एसयूव्ही विकत होती, सध्या, निसान भारतात फक्त एक मॉडेल विकत आहे, ते म्हणजे निसान मॅग्नाइट. हे मॉडेल टाटा पंच, रेनॉ किगर आणि ह्युंदाई व्हेन्यू सारख्या कारशी स्पर्धा करते. आता लवकरच निसान इंडिया मॅग्नाइट एसयूव्ही मध्ये आणखीन एक पावरट्रेन ऑप्शन लॉन्च करत आहे. त्यानुसार एसयूव्ही एक लिटर नॅचरली एस्पिरेटेड इंजिन सोबत ऑटोमॅटिक मॅन्युअल ट्रान्समिशनसह लॉन्च करण्यात येणार आहे.
किंमत
निसान मॅग्नाइटमध्ये ऑटोमॅटिक गेअर बॉक्स लॉन्चिंग नंतर ग्राहकांसाठी ४ पावर ट्रेन ऑप्शन उपलब्ध असतील. ज्या ग्राहकांना कॉम्पॅक्ट एसयूव्हीमध्ये ऑटोमॅटिक गिअर बॉक्स हे ऑप्शन गरजेचे वाटते अशा ग्राहकांसाठी ही सर्वात परवडणारी कार असेल. या कारची किंमत 9.50 लाख रुपये असू शकते.
स्पेसिफिकेशन
निसान मॅग्नाइट मध्ये 999CC पेट्रोल इंजिन उपलब्ध आहे. हे इंजिन 6,250 RPM वर 71 बीएसपी पावर आणि 3500 RPM वर 96 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजन पाच स्पीड मॅन्युअल गिअर बॉक्स सहल लॉन्च करण्यात आले होते. परंतु ज्या ग्राहकांना ऑटोमॅटिक पावर ट्रेन सह मॅग्नाइट SUV हवी असं वाटत होतं त्यांच्यासाठी 1 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन असलेली कार पसंतीस होती. हे इंजिन 5000 rpm वर 99 बीएचपी आणि 2200 ते 4400 आरपीएम वर 152 एनएम पीक टॉर्क जनरेट करत होती. आणि यासोबत पाच स्पीड मॅन्युअल आणि एक ऑटोमॅटिक सिविटी यामध्ये उपलब्ध होती. ऑटोमॅटिक असल्यामुळे ग्राहकांना ही एसयुव्ही मोठ्या प्रमाणात आवडत होती. परंतु आता ग्राहकांसाठी निसान मॅग्नाइट मध्ये ऑटोमॅटिक पावर ट्रेनचा ऑप्शन देण्यात येणार आहे.
फिचर्स
मॅग्नाइटमध्ये स्मार्ट वॉच कनेक्टिव्हिटी, सात इंच टीएफटी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, आठ इंच इन्फोटेनमेंट सिस्टीम, वायरलेस एप्पल कार प्ले, अँड्रॉइड ऑटो, 360 डिग्री कॅमेरा यासारखे कनेक्टिव्हिटी फीचर्स देण्यात आले आहे. त्याचबरोबर हिल स्टार्ट असिस्ट, एबीएस, , ईबीडी, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम, ट्रॅक्शन कंट्रोल, आणि एअर बॅग यासारखे सेफ्टी फीचर्स देखील देण्यात आले आहे.
या कारला टक्कर देईल
निसान मॅग्नाइट सहा व्हेरियंट मध्ये उपलब्ध आहे. यामध्ये XE, XL, XV, XV DT, XV premium, XV premium DT या व्हेरीएंटचा समावेश होतो. ही गाडी हे टाटा पंच, रेनॉल्ट किगर, नवीन लॉन्च करण्यात आलेली हुंडाई एक्सेक्ट, सिड्रॉन सी थ्री या सर्व सब कॉम्पॅक्ट एसयूव्हीला टक्कर देईल. त्याचबरोबर आगामी मॅग्नाइट एएमटी, टाटा पंच आणि हुंडाई एक्सेंट यांच्या तुलनेत सीट्रॉन सी थ्री मी फक्त पाच स्पीड मॅन्युअल गिअर बॉक्स सहल लॉन्च करण्यात आली आहे. आणि अन्य SUV मध्ये एएमटी गिअर बॉक्स ऑप्शन देण्यात आले आहे.