बाब्बो!! या 5 ठिकाणी माणसांना No Entry; नेमकं आहे तरी काय?

टाइम्स मराठी । आपल्यासाठी प्रवास करण्याचे वेगवेगळे मार्ग उपलब्ध आहेत. यासोबतच बऱ्याचदा आपण प्रवास करत असताना आपल्याला विशेष अधिकार आहे असं गृहीत धरत असतो. याचे कारण म्हणजे आधुनिक वाहतूक. या वाहतुकीमुळे आपण जगातील काही ठिकाणी दोन दिवसांमध्ये पोहोचतो. परंतु पृथ्वीवर असे काही ठिकाण आहेत, त्या ठिकाणी आपण जाऊ शकत नाही. या रहस्यमय ठिकाणांवर आतापर्यंत कोणाला जाण्याची परवानगी अजूनही मिळाली नाही. अशाच 5 ठिकांणाबद्दल आज आपण जाणून घेऊयात.

   
Area US 51

1) एरिया यूएस 51 (Area US 51)

जगातील रहस्यमय ठिकाणांमध्ये अमेरिकेच्या एरिया यूएस 51 हा भाग देखील येतो. या ठिकाणी नेमकं काय आहे हे कोणालाच माहिती नसून बरेच जण या ठिकाणी एलियन टेक्नॉलॉजी किंवा एलियन जीव असल्याचं सांगतात. हे ठिकाण 2013 मध्ये अस्तित्वात आल्याचे मानले जाते. या ठिकाणी हाय सेक्युरिटी करण्यात आलेली असून यासोबत कॉन्सपीरेसि थिएरी जोडण्यात आली आहे. एरिया 51 हे अमेरिका येथील निवादामध्ये लास वेगास पासून 133 किलोमीटर अंतरावर आहे. ही अमेरिका एअर फोर्सची टेस्टिंग आणि ट्रेनिंग रेंज फॅसिलिटी असून या एअर बेस वर हत्यारांचे प्रशिक्षण आणि नवीन विमानांची ट्रेनिंग केलं जाते. 1955 मध्ये ही जागा अमेरिकन हवाई दलाने ताब्यात घेतली. 2013 पर्यंत CIA ने कधीच फॅसिलिटीच्या अस्तित्वाचा स्वीकार केला नाही. 2005 मध्ये माहिती स्वातंत्र्य कायद्याच्या विनंतीनंतर त्यांनी हे स्वीकार केले. या भागाला कधीच सीक्रेट बेस घोषित करण्यात आले नव्हते परंतु या ठिकाणी काय होतं? या ठिकाणी कशा पद्धतीने रिसर्च केले जाते याबाबत संपूर्ण माहिती गुप्त ठेवण्यात आली आहे. कॉन्फिरेन्सी थेअरीस्ट मानतात की या ठिकाणी एलियन स्पेस क्राफ्ट झाले होते. 1950 मध्ये झालेल्या रोसवेल अपघातासोबत त्याला जोडलं जाते.

p07fp3mp

2) युक्रेनचे चेअर नोबिल क्षेत्र (Chernobyl Area)

या ठिकाणी 36 वर्षांपूर्वी म्हणजेच 26 एप्रिल 1986 ला तत्कालीन सोवियेत युनियन मधील चरणो बिलच्या अनुऊर्जा प्रकल्पामध्ये भीषण स्फोट झाला होता. हा अपघात एवढा भीषण होता की प्लांट मध्ये काम करणाऱ्या 32 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. याशिवाय शेकडो कर्मचारी अनुवीकिरणामुळे भस्मसात झाले होते. ही घटना लपवण्याचा पूर्ण प्रयत्न करण्यात आला होता. हे क्षेत्र पृथ्वीवर सर्वात प्रसिद्ध निषिद्ध ठिकाणांमधून एक आहे. हा स्पोट न्यूक्लियर पावर प्लांट मध्ये एक टेस्ट करण्यात येत होती. या टेस्टच्या माध्यमातून वीज सप्लाय बंद झाल्यानंतर बाकीचे उपकरणे काम करतात की नाही याची तपासणी शास्त्रज्ञ करत होते. त्याचवेळी हा स्फोट झाला. या स्फोटामुळे हे सर्वात प्रदूषित क्षेत्र असून या ठिकाणी पोहोचण्याची कोणालाच परवानगी देण्यात आलेली नाही. या ठिकाणी जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहे.

North Sentinel Island

3) उत्तर सेंटीगल द्वीप (North Sentigal Island)

अंदमानच्या उत्तर सेन्टेनल द्वीप वर प्रतिबंधित क्षेत्र परमिट लागू करण्यात आलेले आहे. यामुळे त्या ठिकाणी कोणी जाऊ शकत नाही. या द्वीप वर जगापासून संरक्षित आणि अलिप्त राहून आदिवासी लोकांनी अमेरिकन नागरिकांची हत्या केली होती. हे द्वीप भारत आणि बंगालच्या समुद्रामध्ये बसलेले असून ते आदिवासी लोकांची वस्ती आहे. या आदिवासी लोकांनी बाहेरच्या जगासोबत संपर्क करण्याचा विरोध केला असून हे एक संरक्षित क्षेत्र बनले आहे.

Mount Weather Emergency Operations Center

4) माउंट वेदर इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर (Mount Weather Emergency Operations Center)

या सेंटरची जागा लाउदौन आणि क्लार्कच्या सीमेवरील ब्ल्यू रेंजमध्ये आहे. राष्ट्रीय हवामान ब्युरो ने 1900 नंतर हवेच्या संशोधनासाठी हवामान फुगे आणि पतंग लॉन्च करण्यासाठी हे सेंटर खरेदी केले होते. या सेंटरची जबाबदारी वेगवेगळ्या फेडरल संस्थांकडे हस्तांतरित करण्यात आली असून यापूर्वी युएस आर्मी क्रॉप्स आणि इंजिनियर्स ऑफिस ऑफ इमर्जन्सी प्रीपेडनेसयांच्याकडे होती. या सेंटरचा उद्देश निरंतरता सुनिश्चित करणे हे असून या ठिकाणी जाण्यासाठी सर्वसाधारण व्यक्तींना परवानगी देण्यात येत नाही.

Brazil Snake Island

5) ब्राझील स्नेक आयलंड- (Brazil Snake Island)

साओ पाउलो या ठिकाणी असलेल्या इल्ला दे क्वेईमाडा ग्रँड आयलँड या ठिकाणी जगातील सर्वात जास्त विषारी सापांचे घर आहे. या ठिकाणी नागरिकांना येण्यासाठी पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. हे ठिकाण स्नेक आयलँड च्या नावाने ओळखले जाते. सापांपासून उद्भवणारे बरेच धोके लक्षात घेता ब्राझील सरकारने मानव सुरक्षा आणि या प्रजातींची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी या ठिकाणी जाणे प्रतिबंधित केले आहे.