Noise कंपनीने लॉन्च केले नवीन Aura Buds; किंमत 1500 रुपयांपेक्षाही कमी

टाइम्स मराठी । Noise कंपनी भारतात अप्रतिम कॉलिटी मध्ये इयर बड्स आणि  प्रॉडक्ट लॉन्च करत असते. आता कंपनीने भारतात नवीन TWS इयर बड्स लॉन्च केले आहे. या इयरबड्स चे नाव Noise Aura Buds आहे. Noise कंपनीच्या बाकीच्या प्रॉडक्ट प्रमाणे कंपनीने हे इयर बड्स सुद्धा परवडणाऱ्या किमतीमध्ये उपलब्ध केले आहे. त्यानुसार कंपनीने लॉन्चिंग प्राईस1500 रुपयांपेक्षाही कमी ठेवली आहे. या बड्स ला IPX5 रेटिंग मिळाली आहे. म्हणजेच हे इयर बड्स पाणी आणि  घामाने होणाऱ्या नुकसानी पासून वाचवते. जाणून घेऊया या इयर बड्स चे स्पेसिफिकेशन आणि फीचर्स.

   

फीचर्स

Noise Aura Buds कंपनीने अत्यंत मेहनतीने डेव्हलप केले आहे. यामध्ये सिलिकॉन इयर टिप्स दिले आहे. जेणेकरून बड्स वापरत असताना फिटिंग इशू येणार नाही. या इयर बड्स वर टॅप केल्यावर बरेच फंक्शनिंग ऑप्शन बघायला मिळतात. बड्स मध्ये देण्यात आलेल्या ऑडिओ पार्ट मध्ये 12 mm पॉलिमर कंपोझिट ड्रायव्हर लावण्यात आले आहे. जेणेकरून कॉलिंग वेळी  क्लियर आवाज येईल. यासोबतच क्वाड माईक एन्व्हायरमेंट नॉईस कॅन्सलेशन देखील यामध्ये उपलब्ध आहे. जर तुम्ही हे इयर बड्स गेमिंग साठी खरेदी करणार असाल तर यामध्ये गेमिंग साठी 50 ms लो लेटेन्सी मोड मिळतो.

कनेक्टिव्हिटी

NOISE कंपनीच्या हायपर सिंक कनेक्टिव्हिटी टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून AURA BUDS डिवाइसला लवकर तयार होतात. हे इयर बड्स एकाच वेळी दोन डिवाईस सोबत कनेक्ट होतात. AURA BUDS हे दिसण्यासाठी आकर्षक असून हे इयर बर्ड्स सिंगल चार्ज मध्ये 60 तासांपर्यंत बॅकअप देऊ शकतात. इयर बड्स 10 मिनिटांच्या चार्जिंग मध्ये 150 मिनिटे वापरता येतील.

किंमत

Noise Aura Buds कंपनीने 1500 रुपयांपेक्षा कमी किमतीमध्ये लॉन्च केले आहे. त्यानुसार या इयर बड्स ची किंमत 1,399 रुपये आहे. कंपनीने या बर्ड्स मध्ये ऑरा व्हाइट, ऑरा ब्ल्यू, ऑरा ब्लॅक कलर ऑप्शन उपलब्ध केले आहे. तुम्ही हे इयर बड्स खरेदी करण्याचा विचार करत असाल तर अमेझॉन  इंडिया आणि नॉईसच्या वेबसाईट वरून खरेदी करू शकतात. कंपनीकडून हे बड्स 23 नोव्हेंबर पासून खरेदीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे.