Noise Colorfit Caliber 3 : Noise ने लाँच केलं नवीन स्मार्टवॉच; दिवाळीला गिफ्ट देण्यासाठी ठरेल बेस्ट

टाइम्स मराठी । Noise कंपनीने भारतीय मार्केटमध्ये नवीन स्मार्टवॉच लॉन्च केलं आहे. या नवीन लॉन्च करण्यात आलेल्या स्मार्टवॉच मध्ये कंपनीने वेगवेगळे फीचर्स ॲड केले आहेत.   Noise ColorFit Caliber 3 असे या स्मार्टवॉचचे नाव असून याची किंमत 2499 रुपये आहे. Noise ColorFit Caliber 3 या स्मार्टवॉच मध्ये कंपनीने मिंट ग्रीन, स्पेस ब्ल्यू, रोज पिंक, जेट ब्लॅक, डीप वाईन हे कलर ऑप्शन उपलब्ध केले आहे. तुम्ही देखील हे स्मार्टवॉच खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Noise कंपनीच्या वेबसाईटवरून खरेदी करू शकतात.

   

स्पेसिफिकेशन

Noise ColorFit Caliber 3 या स्मार्टवॉच मध्ये 1.78 इंच AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले ऑलवेज ऑन फीचर्स सह सुसज्ज आहे. यामध्ये कंपनीने ब्लूटूथ कॉलिंग फीचर देखील उपलब्ध केले असून या स्मार्टवॉच मध्ये देण्यात आलेली बॅटरी ही पावरफुल आहे. एकदा हे स्मार्टवॉच फुल्ल चार्ज केल्यावर 7 दिवसापर्यंत चालते. तुम्ही हे स्मार्ट वॉच ब्लूटूथ कॉलिंग सह वापरणार असाल तर आरामात 2 दिवस बॅटरी चालेल.

फिचर्स- Noise Colorfit Caliber 3

Noise ColorFit Caliber 3 या स्मार्टवॉच मध्ये तुम्हाला नोटिफिकेशन डिस्प्ले रिमाइंडर अलार्म कॅमेरा कंट्रोल म्युझिक कंट्रोल कॅल्क्युलेटर वेदर अपडेट यासारखे एडिशनल फीचर्स देण्यात येतील. यासोबतच स्मार्टवॉच मध्ये बरेच हेल्थ मॉनिटरिंग फीचर्स उपलब्ध आहे. यामध्ये 24×7 हार्ट रेट मॉनिटर, Spo2 सेंसर, स्लिप ट्रेकिंग, ट्रेस मॅनेजमेंट यासारखे बरेच हेल्थ मॉनिटरिंग फिचर्स आहेत. याशिवाय स्मार्टवॉचला  IP68 वॉटर आणि डस्ट  रजिस्टन्स रेटिंग  देण्यात आले आहे. म्हणजेच हे स्मार्टवॉच तुम्ही पाणी धूळ अशा कोणत्याही परिस्थितीमध्ये वापरू शकता.

वॉच फेसेस

Noise ColorFit Caliber 3 यामध्ये 100 पेक्षा जास्त कस्टमाइजिबल वॉच फेसेस उपलब्ध आहेत. ही स्मार्टवॉच  NOISE TRU SYNC टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते. यामध्ये बरेच स्पोर्ट्स मोड देखील उपलब्ध आहेत. यंदा दिवाळीला गिफ्ट म्हणून तुम्ही ही स्मार्टवॉच नक्कीच देऊ शकतात.