Noise ने लाँच केली नवीन स्मार्टवॉच सिरीज; पहा किंमत आणि फीचर्स

टाइम्स मराठी । Noise ब्रँडने भारतीय मार्केटमध्ये नवीन Noise Colorfit Pro 5 स्मार्टवॉच सिरीज लॉन्च केली आहे. या सिरीज मध्ये कंपनीने दोन मॉडेल लॉन्च केले असून यामध्ये आकर्षक फीचर्स उपलब्ध आहेत. या दोन्ही स्मार्टवॉचचे नाव Noise Colorfit Pro 5 आणि Noise Colorfit Pro 5 Max आहे. कंपनीने लॉन्च केलेली नवीन स्मार्टवॉच सिरीज ही Noise Colorfit Pro 4 सिरीजची नेक्स्ट जनरेशन सिरीज आहे. म्हणजेच Noise Colorfit Pro 4 पेक्षा अपडेटेड फीचर्स या नवीन सिरीज मध्ये मिळतील. जाणून घेऊया या नवीन स्मार्टवॉच सिरीजचे फिचर्स आणि स्पेसिफिकेशन.

   

स्पेसिफिकेशन

Noise Colorfit Pro 5 या स्मार्टवॉच मध्ये 1.85 इंच AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. आणि Noise Colorfit Pro 5 Max मध्ये 1.93 इंच AMOLED डिस्प्ले मिळेल. या दोन्ही स्मार्टवॉच मध्ये उपलब्ध करण्यात आलेली बॅटरी पूर्णपणे चार्ज केल्यास 7 दिवसापर्यंत बॅटरी लाईफ देते. म्हणजेच तुम्हाला 7 दिवसापर्यंत स्मार्टवॉच चार्जिंगचे टेन्शन घेण्याची गरज नाही.

फिचर्स

Noise Colorfit Pro 5 आणि Noise Colorfit Pro 5 Max या स्मार्टवॉच मध्ये नॉईज हेल्थ सूट फीचर्स देखील देण्यात आले आहे. या फीचर्सच्या माध्यमातून यूजर्स त्यांच्या आरोग्यावर पूर्णपणे नजर ठेवू शकतात. यामध्ये हार्ट बीट्स, SpO2 2 यांची देखील माहिती मिळेल. या दोन्ही स्मार्टवॉच IP68 रेटिंग सह उपलब्ध आहेत. म्हणजेच तुम्ही या स्मार्टवॉच कोणत्याही परिस्थितीत वापरू शकतात. तुम्ही या स्मार्टवॉच पाण्यामध्ये किंवा प्रदूषण असलेल्या ठिकाणी देखील वापरू शकतात.

कनेक्टिव्हिटी फीचर्स

Noise Colorfit Pro 5 आणि Noise Colorfit Pro 5 Max या स्मार्टवॉचमध्ये युजर्सला 100 स्पोर्ट्स मोड आणि 150 पेक्षा जास्त वॉच फेसेस मिळतील. एवढेच नाही तर कनेक्टिव्हिटी फीचर्स देखील यामध्ये उपलब्ध आहे. त्यानुसार ब्लूटूथ 5.3 आणि SOS या कनेक्टिव्हिटी देखील युजर्स ला मिळतील.

किंमत

Noise Colorfit Pro 5 या स्मार्टवॉच ची किंमत 3,999 रुपये एवढी आहे. आणि Noise Colorfit Pro 5 Max या स्मार्टवॉचची किंमत 4,999 रुपये आहे. यासोबतच कंपनीने एलीट एडिशन देखील उपलब्ध केले आहे. तुम्ही देखील ही स्मार्टवॉच खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, फ्लिपकार्ट, अमेझॉन इंडिया, मिंत्रा, GoNoise.com यासोबतच कोणत्याही अधिकृत रिटेलर्सच्या माध्यमातून खरेदी करू शकतात.