Noise Smart Ring भारतात प्रथमच लाँच; पहा किंमत आणि फीचर्स

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेमध्ये Noise ने पहिली स्मार्ट रिंग (Noise Smart Ring) लॉन्च केली आहे. या स्मार्ट रिंगला कंपनीने लुना (Luna) असे नाव दिले आहे. ही कंपनीची सर्वात पहिली स्मार्ट रिंग असून ही स्मार्ट रिंग 7 रिंग साईज आणि पाच कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. ही रिंग डेली हेल्थ ऍक्टिव्हिटीवर लक्षात ठेवते. यामध्ये तीन मॅट्रिक्स उपलब्ध आहेत. त्यापैकी स्लिप, रीडनेस आणि ऍक्टिव्हिटी. यासोबतच 70 पेक्षा जास्त मेट्रिक्सवर ही स्मार्ट रिंग लक्ष ठेवते. या स्मार्ट रिंग मध्ये ॲडव्हान्स सेंसर आणि फीचर देण्यात आले आहेत. भारतीय बाजारात Noise च्या या पहिल्यावाहिल्या रिंग ची किंमत14999 रुपये एवढी आहे. कंपनीने या स्मार्ट रिंगवर काही डिस्काउंट ऑफर देखील उपलब्ध केले आहेत.  आज आपण जाणून घेऊया या स्मार्ट रिंगचे खास फीचर्स

   

स्पेसिफिकेशन- Noise Smart Ring

लुना या स्मार्ट रिंगला अल्ट्रा लाईट वेट 3mm फॉर्म फॅक्टरसह डिझाईन करण्यात आले आहे. त्याचबरोबर ही स्मार्ट रिंग फाइटर जेट ग्रेड टायटॅनियम आणि हिऱ्या सारख्या कोटिंगने बनवण्यात आली आहे. या स्मार्ट रिंग मध्ये BLE 5 टेक्नॉलॉजी आणि 50 मीटर पर्यंत वॉटर रेसिस्टंट उपलब्ध आहे. एवढेच नाही तर Noice च्या ही स्मार्ट रिंग एकदा चार्ज केल्यानंतर ६ दिवसांपर्यंत बॅटरी लाईफ देते. याशिवाय यामध्ये टेंपरेचर  सेन्सर, आहार आणि व्यायाम ट्रॅक करण्याची क्षमता आहे.

किंमत आणि ऑफर-

लुना ही स्मार्ट रिंग 4 ऑक्टोबरच पासून Noice च्या वेबसाईटवर gonoise.com वर ऑनलाईन पद्धतीने खरेदी केली जाऊ शकते. या स्मार्ट रिंग ची किंमत 14 हजार 999 रुपये आहे. तुम्ही ही Noise Smart Ring एस्क्युजिव्ह प्रायोरिटी एक्सेस पास वरून प्री बुक करू शकता. त्यानंतर तुम्हाला खरेदीच्या दिवशी 1000 रुपयांची सूट मिळेल. एवढेच नाही तर पास धारक स्मार्टआईवीयर, नॉईज i1 वर अतिरिक्त दोन हजार रुपयांची सूट देखील मिळू शकते.