118 रुपयांत घरी घेऊन जा Nokia चा हा Mobile; कुठे आहे ऑफर?

टाइम्स मराठी । आजकाल प्रत्येक ठिकाणी मोबाईलचा वापर होत आहे. यासोबतच बऱ्याच मोबाईल निर्माता कंपन्या आता 5g स्मार्टफोन डेव्हलप करण्याकडे लक्ष केंद्रित करत आहे. कंपन्या या स्मार्टफोनमध्ये वेगवेगळे फीचर्स उपलब्ध करत असून स्मार्टफोन सिरीज मध्ये देखील प्रतिस्पर्धा बघायला मिळते. ज्याप्रमाणे मॉडर्न जनरेशनच्या  स्मार्टफोनची चलती मोठ्या प्रमाणात आहे, त्याचप्रमाणे  कीबोर्ड फोनची तेवढीच हवा दिसून येते. कितीही मॉडेल्स स्मार्टफोन आले तरी देखील कीपॅड फोन खरेदी करण्याचा कल कमी होत नसून मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या कीपॅड फोन मध्ये आता बरेच फीचर्स कंपनीकडून ॲड करण्यात येत आहे. Nokia कंपनीने सुरुवाती पासूनच कीपॅड फोन लॉन्च करत अधीराज्य गाजवले आहे. आता काही दिवसांपूर्वी Nokia 105 हा फोन लॉन्च करण्यात आला होता. तुम्ही हा मोबाईल खरेदी करण्याचा विचार करत असाल तर अवघ्या 118 रुपयांत घरी घेऊन जाऊ शकता. कसे ते आम्ही सांगतो..

   

ऑफर

Nokia 105 हा फोन तुम्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर EMI ऑप्शन च्या माध्यमातून फक्त 118 रुपयांच्या किमतीत घरी घेऊन जाऊ शकतात. कंपनीने या फोनवर ऑफर उपलब्ध केल्या आहेत. त्यानुसार हा फोन Amazon वर 1,299 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. परंतु या मोबाईल वर बँक डिस्काउंट ऑफर देण्यात येत आहे. जर तुम्ही हा फोन HDFC बँक क्रेडिट कार्ड च्या मदतीने खरेदी करणार असाल तर तुम्ही 12 महिन्यांच्या EMI ऑप्शन वर खरेदी करू शकतात. म्हणजेच तुम्हाला एक वर्ष 118 रुपये जमा करावे लागेल. एवढेच नाही तर तुम्ही 3 महिन्यांचा EMI ऑप्शन घेऊ इच्छित असाल तर  445 रुपये  आणि 6 महिन्यांसाठी 227 रुपये मंथली EMI भरावा लागेल.

Nokia 105 classic डिझाईन

Nokia 105 Clasic या ब्रँडेड फोन मध्ये एर्गोनॉमिक डिझाईन देण्यात आली आहे. कंपनीने या फोनमध्ये अल्फान्यूमरिक कीपॅड सह इनबिल्ड UPI एप्लीकेशन देखील उपलब्ध केले आहे. यामध्ये  वायरलेस FM रेडिओ प्रोव्हाइड  करण्यात आले असून यामध्ये सिंगल सिम आणि ड्युअल सिम हे दोन ऑप्शन उपलब्ध आहे. Nokia च्या या फिचर फोन मध्ये इनबिल्ड UPI एप्लीकेशन सह सेफ्टी आणि UPI पेमेंट करण्यासाठी परमिशन उपलब्ध आहे.

Nokia 105 Clasic बॅटरी

Nokia 105 Clasic या ब्रँडेड फोनची ड्युरीबिलिटी टेस्टिंग देखील करण्यात आली. जेणेकरून कोणत्याही वातावरणाचा सामना हा फोन करू शकेल. या फोनमध्ये देण्यात आलेल्या कीपॅड वर देण्यात आलेल्या बटनांवर स्पेशल लक्ष दिले आहे. अंधारामध्ये देखील या फोनच्या माध्यमातून नंबर डायल करणे आणि टेस्ट करणे सोपे आहे. यामध्ये कंपनीने 800 mAh  बॅटरी दिली आहे.